SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! किसान क्रेडिट कार्ड न देणाऱ्या बॅंकांची येथे करा तक्रार..

शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, त्याला सोन्याचे दिवस यावेत, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शेतीसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात येतो.

शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेली अशीच एक योजना आहे, ‘किसान क्रेडिट कार्ड’ अर्थात केसीसी..(KCC).. ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात बॅंकांकडून कर्जपुरवठा करण्यात येतो. मात्र, अनेक बॅंका शेतकऱ्यांना या योजनेतून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे..

Advertisement

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळविताना, शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या बातम्या माध्यमातून पाहायला मिळतात. बॅंका योजनेचा लाभ देताना अडवणूक करीत असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनीही केला आहे. मात्र, जर एखादी बॅंक असे काही करीत असेल, तर शेतकऱ्यांना बॅंकेविरोधात तक्रार करण्याचा अधिकार आहे..

किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. कारण, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही हमीशिवाय सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या योजनेतून जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे, व्याजातही मोठ्या प्रमाणात सूट मिळते..

Advertisement

देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असावे, जेणेकरुन शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बॅंकांकडून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळेल, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, बॅंकांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे..

किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी बॅंका अडवणूक करीत असल्यास, शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण, अशा बॅंकांविरोधात शेतकऱ्यांना तक्रार करता येते. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार, शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर बॅंकांना 15 दिवसांत किसान क्रेडिट कार्ड करावे लागते. तसे न केल्यास शेतकरी तक्रार करु शकतात.

Advertisement

बॅंकेचे अधिकार किसान क्रेडिट कार्ड देण्यास टाळाटाळ करीत असतील, तर बॅंकिंग लोकपालाकडे तक्रार करता येते. तसेच https://cms.rbi.org.in या संकेतस्थळावरही तक्रार करता येते..तसेच ‘केसीसी’चा हेल्पलाईन क्रमांक 0120-6025109 / 155261 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता..

केसीसीसाठी आवश्यक कागदपत्रे..?
मतदार ओळखपत्र
पॅनकार्ड
पासपोर्ट
आधारकार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
(आयडी प्रुफचे कोणतेही दस्ताऐवज पत्याच्या पुराव्यासाठी वैध असतील.)

Advertisement

कोण अर्ज करु शकतो..?
कृषी, मत्सपालन, तसेच पशूसंवर्धनाशी संबंधित कोणतीही व्यक्ती ‘केसीसी’साठी अर्ज करु शकते. त्यासाठी किमान वय 18 वर्षे ते कमाल 75 वर्षे वयाची अट आहे. शेतकऱ्याचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असल्यास सहअर्जदार आवश्यक आहे.

किती व्याजदर आहे..?
‘केसीसी’ अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे कर्ज केवळ 7 टक्के व्याजावर मिळते. नियमित कर्जफेड केल्यास त्यावर 3 टक्के सूटही मिळते. म्हणजेच प्रामाणिक शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदरानेच कर्ज मिळते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement