SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लाईट बिल निम्म्यापेक्षा कमी करायचंय? मग वापरा ‘या’ स्मार्ट टिप्स..

जगात सर्वच ठिकानी विजेचा वापर होतो. आजकाल नवनवीन तंत्रज्ञान येते. काही वस्तू , गॅजेट्स बाजारात येतात. ते वापरण्यासाठी म्हणा किंवा घरातील पंखा, मोबाईल, टीव्ही वगैरे आपण विजेचा वापर करतो. मग वीज बिलाचा खर्चही त्यानुसार आपल्याला येतो. बऱ्याच जणांसाठी वीजेची बिल (Electricity bill) हे दर महिन्याच्या खर्चातील एक महत्त्वाचा हिस्सा असतो.

आपण वीजेचा वापर करतो, पण विजेचं बिल कमी यावं किंवा बिल यंदा जास्तच आलं, असं आपल्याला वाटतं. मग आपण यासाठी कोणताही चुकीचा मार्ग न अवलंबता वीजबिल कमी यावे यासाठी काय उपाय करू शकता, ते माहीत करून घेऊ..

Advertisement

वीजबिल कमी करण्याचे उपाय:

नॉर्मल बल्बमुळे वीजेचा जास्त खप : घरात विजेचा वापर हा टाळता येत नाही पण किती वापर करायचा हे आपल्या हातात आहे. जर तुम्ही जास्त येणाऱ्या वीजबिलाच्या समस्येला तोंड देत असाल, तर तुम्हाला घरातील काही उपकरणे बदलावी लागतील. जर तुम्ही जुने बल्ब वापरत असाल तर असे बल्ब वापरणे बंद करा. हे जुन्या पद्धतीचे बल्ब जास्त वीज खेचतात म्हणजेच वापर करतात. असे बल्ब काढून बाजारात सीएफएल बल्ब किंवा आपण त्यांना कांडी बल्ब म्हणतो ते बल्ब आणा. त्याने कमी वीज वापरात येईल. वीजेचा खप कमी झाल्यामुळे तुमच्या वीजबिलात मोठी कपात होऊ शकतो.

Advertisement

हीटरचा वापर टाळा : उन्हाळयात आपण थंडगार पाण्याने आंघोळ करू शकतो पण हिवाळयात हीटरचा वापर करून जर पाणी तापवत असू तर याने विजेचा वापर वाढून पाचशे-सातशे रुपये बिल वीजबिल महिन्याला जास्त येऊ शकते. अर्थात तुमचं महिन्याचं एकूण बिल हे एक हजार रुपयांच्याही पुढे नक्कीच जाईल यात शंका नाही. यासाठी तुम्ही एक महिना सिलिंडरचा वापर करून गॅस शेगडीवर पाणी तापवून बघा दोनशे-तीनशे रुपयांपर्यंतचा फायदा थोडाफार फायदा हा नक्कीच होईल. जर तुम्ही जास्त 1000 वॅट क्षमतेच्या हीटरचा वापर करत असाल तर लगेच असा हीटर काढून टाका.

जुना गीझर वापरत बसाल तर…: आजही अनेक घरांमध्ये सध्या पाणी गरम करण्यासाठी हिटर रॉड किंवा जुन्या जमान्याच्या गीझरचा वापर करण्यात येतो. हे गीझर मोठ्या प्रमाणावर वीज खेचते, मग वीजबिल वाढते. म्हणून रॉड आणि जुन्या जमान्याच्या गीझरच्या जागी घरात ॲडव्हान्स गीझर लावा. तुमचा नवा गीझर 5 स्टार रेटिंगवाला असला, तर उत्तमच आहे. 5 स्टार रेटिंगच्या गीझरमुळे वीज कमी खर्च होईल. यामुळे तुमचे वीजबिल झपाट्याने कमी होईल आणि दर महिन्याला तुमच्या बजेटवर येणारा लोड कमी होईल.

Advertisement

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले. बऱ्याच जणांचे हातचे काम गेल्याने थकीत वीजबिल झाल्याने महावितरण किंवा इतर वीज वितरण कंपन्यांवर अधिकचा भार पडला. या कोरोनाचे संकट टाळण्यासाठी सरकारने अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम करण्याचे आदेश दिले होते. या काळात अनेक आयटी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम दिले इंटरनेट सुविधा दिली पण विजबिलाचा खर्च नाही दिला. वर्क फ्रॉम होममुळे घरगुती वीजबिलात वाढ झाली आहे. यामुळे केंद्र सरकार या कर्मचाऱ्यांना वेगळा भत्ता देण्यासाठी लवकरच एक कायदा आणणार असल्याचंही समजतंय.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement