साऊथचा आयकॉन स्टार तसेच अनेक चित्रपट हिट देणारा सुपरस्टार अभिनेता ‘अल्लू अर्जुन’चा बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा द राइज’ (Pushpa – the rise) हा चित्रपट 17 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कोरोना काळात सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता बक्कळ कमाई केली आहे.
ॲमेझॉनला (Amazon) मोठ्या रक्कमेत पुष्पाचे स्ट्रिमिंग राईट्स विकण्यात आले आहेत. 5 जानेवारीलाच याबाबतची घोषणा केली होती. आता असा अंदाज आहे की, तब्बल 27 ते 30 कोटी रुपयांमध्ये विकले याचे राईट्स विकले गेले आहेत. कोरोनामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
‘पुष्पा’ हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 मध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. कमाईच्या बाबतील अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता हा चित्रपट 7 जानेवारी रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) प्रदर्शित होणार असल्याची घोषणा ॲमेझॉनने स्वतः ट्विट करून केली. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटर्समध्ये पुष्पा चित्रपट हिंदी भाषेत (Pushpa movie in hindi) प्रदर्शित झाला असला तरी ॲमेझॉनवर अद्याप तो हिंदी भाषेत उपलब्ध होणार नसला तरी हा चित्रपट काही दिवसांनी येण्याची या प्लॅटफॉर्मवर येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे, तर दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथु प्रभूने आयटम सॉंग (Samantha ruthu prabhu item song O antava mawa) देखील केले आहे.
ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. फक्त लक्षात ठेवा की, या चित्रपटसोबतच काही ठराविक किंमतीचा रिचार्ज केला की तुम्हाला अनेक चित्रपट पाहता येणार आहेत.👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.avod.thirdpartyclient
300 कोटी रुपयांचा जमवला गल्ला :
जगभरात जवळपास 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत ‘पुष्पा-द राइज’ने नवा रेकॉर्ड केला आहे. कमाईचे रोज नवीन उच्चांक हा सिनेमा गाठतोय. पुष्पा सिनेमाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात चित्रपटाची कमाई – 26.89 कोटी होती, तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने – 20.20 कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन होते – 212.10 कोटी रुपये (5 दिवस).
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE