SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ चार गोष्टींचं पालन करा, पैशांची कधी कमी होणार नाही..

आपल्याकडे चांगल्यापैकी पैसा हवा, असं प्रत्येकालाच वाटतं, पण पैसा येऊनही तो टिकवणं हे फार अवघड असतं. पैसा कमविण्यासाठी अपार कष्ट असतं, आपण हे जाणतोच, पण पैसा टिकविण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, हेही कळणं महत्वाचं असतं. म्हणून पैसा टिकत नाही त्यासाठी काय करायचं ? या संदर्भात आर्य चाणक्य यांनी इतिहासकालात काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.

आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya) यांनी सांगितलेल्या धोरणांना आजही तितकंच महत्त्व आहे. आचार्य चाणक्य एक महान विद्धान, राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात व्यावहारिक जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने मांडल्या आहेत.

Advertisement

चाणक्य नीतिनुसार (ChanakyaNiti) ज्या घरात लोकं एकमेकांशी भांडण करतात. घरात कायम कलह असतो, अशा ठिकाणी लक्ष्मी टिकत नाही. ज्या घरात शांतता नसते, तिथे आर्थिक चणचण भासते. तसेच, जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे पैशाशी संबंधित समस्या कधीच येत नाहीत. लक्ष्मीला संपत्तीची देवी आपण म्हणत असतो. चाणक्य नीतित पैशांबद्दल काय सांगितलं आहे, जाणून घेऊयात.

▪️ पैशांवरचे प्रेम आणि अहंकार : प्रत्येकाला जगण्यासाठी पैसा लागतोच, म्हणून माणसाला पैशाचे आकर्षण असले तरी चाणक्य म्हणतात की, पैशाचा मोह कधीच करू नये. बहुतांश गोष्टीसाठी आज पैसाच लागतो. पण जर तुम्ही नेहमी पैसा-पैसा करत राहिले, तर तुम्हाला फक्त पैसाच दिसेल. म्हणून पैसा कमावण्याचे इतकेही वेड नसावे. पैसा मिळाल्यावर जे लोक अहंकारी होतात, त्यांची संपत्ती फार काळ टिकत नाही. जेव्हा संपत्ती येते तेव्हा फळांनी भरलेल्या झाडासारखे होणे शहाणपणाचे आहे, असं ते सांगतात.अहंकाराने माणसं तुटतात म्हणून पैसा नसल्यावर दोन माणसं साथ देतील का याचाही विचार करावा.

Advertisement

▪️ पैशाचे संरक्षण : चाणक्य नीतीमध्ये सांगितल्यानुसार, आपण काही ना काही संपत्ती कमावत असतो. त्यापैकी काही धनाचा वापर दान, गुंतवणूक आणि संरक्षणासाठी आपण करायला हवा. अमाप पैसा असेल, तर तो योग्य ठिकाणी नदीसारखा वापरला पाहिजे. बरेच लोक पैसे साठवतात, ठेवतात आणि तो वापरतही नाहीत. चाणक्य नीतीनुसार वाईट काळात पैसा खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. पैसा उपयोगी पडतो, त्यामुळे तो योग्य ठिकाणी गुंतवा किंवा ठेवा.

▪️ समाजाची भीती : आपण ज्या समाजात राहतो तिथे पैशाची देवाणघेवाण करताना स्थानिक म्हणजेच समाजाची भीती बाळगू नये. या व्यवहारात जो व्यक्ती व्यवहार करू शकत नाही, तो श्रीमंत होण्याची शक्यता कमी असते. याशिवाय चाणक्य नीतीनुसार जे लोक विनाकारण पैसे खर्च करत असतात त्यांच्यावर लक्ष्मी नाराज होते आणि असं ठिकाण किंवा व्यक्ती सोडून जाते. तिथे पैसा टिकणे या अवघड होऊन बसते.

Advertisement

▪️ योग्य मार्गाने कमावलेला पैसा : आपल्या आयुष्यात पैसा हा नात्यांची किंमत करणारा ठरू शकतो. म्हणून भरपूर पैसा कमविला तर तो कोणत्या मार्गाने कमविला हे देखील आपल्याला समजायला हवं, कारण तो पैसा पटकन जाणारा आहे आणि त्याला अनेक वाटा आपोआप मिळतात. तुमच्या आसपासही तुम्ही अनेक उदाहरणे बघितली असतीलच. चाणक्य नीतिनुसार गैर मार्गाने कमावलेल्या पैशाचे आयुष्य फक्त दहा वर्षांचे असते. अकराव्या वर्षानंतर अशा पैशांचा नाश होऊ लागतो आणि तो तुमचा मूळ पैसा, जे काही तुमच्या मालकीचे आहे ते काढून घेतो. म्हणून असं म्हणतात की, पैसा नेहमी योग्य मार्गाने मिळवला पाहिजे. कारण चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा काही काळासाठीच आधार देतो आणि तो नंतर वेगाने खर्च करण्याची कारणेही वाढून टिकत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement