SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांनो, बॅंक खात्यावर दोन हजारांचा हप्ता आला का..? नसल्यास कधीपर्यंत मिळणार पैसे, वाचा..!

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारने शेतकऱ्यांना ‘गुड न्यूज’ दिली होती.. देशातील तब्बल 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार, एका झटक्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा झाले..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मोदी सरकारने नुकताच 10वा हप्ता शेतकऱ्यांना दिला. देशातील 10.09 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,900 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, मोदी सरकारकडून 10 हप्ता वर्ग करण्यात आला असला, तरी असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या खात्यावर 2000 रुपयांची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हे पैसे येतील की नाही, अशी काळजी या शेतकऱ्यांना लागली आहे..

पीएम किसान पोर्टलवर ‘स्टेटस’ तपासल्यास, त्यावर ‘कमिंग सून’ (coming soon) असे लिहिल्याचे दिसून येते. म्हणजेच, लवकरच हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, हे ‘स्टेटस’ कसे पाहायचे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…!

Advertisement

असे पाहा स्टेट्स..!
– पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.nic.in वर जा.
– वेबसाइटच्या उजव्या बाजूला ‘फार्मर्स काॅर्नर’ (Farmers Corner)वर क्लिक करा.
– ड्रॉप डाउन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
– नंतर ‘गेट रिपोर्ट’ (Get Report) वर क्लिक करा. नंतर ‘बेनेफिशीरीज स्टेटस’ (Beneficiaries Status) पर्यायावर क्लिक करा.
– समोर येणाऱ्या पेजवर आधार नंबर, मोबाईल नंबर टाकले, की तुमच्या ‘स्टेटस’ची संपूर्ण माहिती मिळेल.

घरबसल्या करा योजनेसाठी नोंदणी
दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आता घरबसल्या रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यासाठी तुमच्या नावे असणारा शेतीचा सात-बारा उतारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते नंबर असायला हवे. योजनेसाठी तुम्ही पात्र असल्यास तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकेल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement