SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रिचार्ज प्लॅन 30 ऐवजी 28 दिवसांचे का असतात..? टेलिकाॅम कंपन्या त्यातून किती पैसा कमावतात..?

सध्या स्मार्टफोन काळाची गरज बनलाय.. त्याशिवाय जगणे केवळ अशक्यच.. या इवल्याशा उपकरणाने सारे जग मुठीत आलंय.. संवादाचे हे साधन, आता अधिक व्यापक झालंय, विस्तारलंय..! कोणत्याही समस्येवर उपाय सांगणारे, मार्गदर्शन करणारे, योग्य मार्ग दाखवणारं हत्यार झालंय..!

स्मार्टफोनचा वापर वाढला, तसा टेलिकाॅम कंपन्यांना ‘अच्छे दिन’ आले.. सीमकार्डशिवाय मोबाईलची कल्पनाही करवत नाही. युजर्सची गरज ओळखून टेलिकाॅम कंपन्यांनी वेगवेगळे ‘रिचार्ज प्लॅन्स’ आणले. त्यातून टेलिकाॅम कंपन्यांमध्ये तिव्र स्पर्धा निर्माण झाली. स्पर्धेत टिकाव धरता न आल्याने काही कंपन्यांना आपला गाशाही गुंडाळावा लागला..

Advertisement

गेल्या काही दिवसांत जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (VI) कंपन्यांनी आपल्या प्लॅनच्या किंमती भरमसाठ वाढवल्या. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसला. त्यात सुरुवातीला 30 दिवसांसाठी हे प्लॅन्स आणले होते. मात्र, नंतर त्यात दोन दिवसांची कपात करताना हे प्लॅन्स 28 दिवसांचे करण्यात आले..

एका महिन्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता का करण्यात आली, त्याचा टेलिकॉम कंपन्यांना कसा फायदा झाला, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

टेलिकाॅम कंपन्यांनी 2 दिवसांची वैधता कमी केल्याने 12 महिन्यांत किती दिवस वाचतात, याचा अंदाज करा. शिवाय 31 दिवसांचा महिना असला, तरी त्यातही 28 दिवसच वैधता मिळते. प्रत्येक महिन्याचे 2-3 दिवस पकडल्यास असा चक्क महिना तयार होतो. दरमहा रिचार्ज केल्यास एका वर्षात 12 ऐवजी 13 महिन्यांसाठी पैसे भरावे लागतात.

कारण, 28 दिवसांच्या वैधतेनुसार 12 महिन्यांसाठी 336 दिवसच फायदे मिळतात. जर 13 महिन्यांसाठी रिचार्ज केले, तर 364 दिवसांची वैधता मिळेल. या 13 व्या रिचार्जमधून टेलिकाॅम कंपन्या कोट्यवधी रुपयांचा नफा कमावतात..

Advertisement

कंपन्या किती पैसा कमावतात..?
– एअरटेलचा सरासरी 153 रुपये युजर बेस 35.44 कोटी युजर्ससोबत गुणिल्यास कंपनी 13 व्या रिचार्जला 5 हजार 415 कोटी रुपये कमावते.

– रिलायन्स जिओ देशातील नंबर एक टेलिकॉम कंपनी.. मात्र, या 13व्या रिचार्जमधून जिओ कंपनीने सुमारे 6,168 कोटी रुपये कमावले आहेत.

Advertisement

– व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या एका रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 90 दिवसांऐवजी 84 दिवसांची वैधता मिळते. त्यातून कंपनी 2934 कोटी रुपये कमावते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement