SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हार्दिक पांड्याचे टीम इंडियातील स्थान धोक्यात, ‘हा’ स्टार खेळाडू घेणार त्याची जागा..?

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या याचा सध्या क्रिकेटमधील सर्वात खराब काळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची बॅट शांत आहे. शिवाय फिटनेसचा प्रश्न गंभीर झाल्याने त्याने बॉलिंगही केली नाही. त्यामुळे टीम इंडियाला सतत पाचव्या बाॅलरची कमतरता जाणवत आहे..

हार्दिकला गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. टी-20 वर्ल्ड कपनंतर तो संघातूनच गायब झाला. आता तर त्याची संघातील जागाच धोक्यात आली आहे. त्याच्या जागी निवड समितीने नवीन ऑलराऊंडरचा शोध सुरु केला आहे..

Advertisement

कपिल देव नंतर भारतीय संघाला कायमच एका चांगल्या ऑल राऊंडरची कमतरता जाणवली. काही काळ हार्दिकने ही उणीव भरुन काढली. मात्र, फिटनेस नि फाॅर्ममुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला नव्याने ऑल राऊंडर खेळाडू निवडावा लागणार आहे.. हार्दिकची जागा कोण घेणार, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे..

हार्दिकची जागा कोण घेणार..?
दरम्यान, टीममधील एका खेळाडूकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे, निवड समितीचीही याच खेळाडूला पहिली पसंती आहे. त्यामुळे हा खेळाडू हार्दिक पांड्याची कायमची जागा घेऊ शकतो.. हार्दिकच्या जागी आलेला हा प्रबळ दावेदार खेळाडू म्हणजे, आपला मुंबईकर शार्दुल ठाकूर..!

Advertisement

‘पालघर एक्सप्रेस’ अशी शार्दुलची ओळख आहे. हार्दिकच्या जागी तो ‘परफेक्ट रिप्लेसमेंट’ असल्याचे बोलले जाते. एक तर तो अफलातून बाॅलिंग करतो. दुसरे म्हणजे, निर्णायक क्षणी जोरदार फटकेबाजी करण्याची क्षमताही त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूर हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतो, असे बोलले जात आहे..

सध्या दक्षिण आफ्रिके विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत शार्दुल ठाकूर खेळत आहे. शार्दुलने दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. त्यानंतर त्याने बॅटिंगमध्येही 28 धावांचे योगदान दिले. तसेच, दुसऱ्या डावातही त्याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली..!

Advertisement

हार्दिकची कसून मेहनत
दरम्यान, हार्दिक पांड्या याच्यावरही निवड समितीचे लक्ष आहे. सध्या तो बंगळुरु येथील ‘एनसीए’मध्ये कठोर मेहनत घेतोय. आपला फिटनेस व फाॅर्म परत मिळविण्यासाठी तो कसून मेहनत घेत आहे. सध्या तरी आपली टीममधील निवडीसाठी विचार करु नये, असे त्याने निवड समितीला कळविले आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement