जगात सध्याच्या काळात खूप अद्ययावत तंत्रज्ञान दिवसेंदिवस अवगत होत आहे. अनेक प्रकारच्या स्मार्ट सोई- सुविधा लोकांना मिळत आहेत, ज्या पूर्वी उपलब्ध नव्हत्या किंवा असल्या तरी वेळेचा अपव्यय होत असे. त्याचबरोबर अनेक जण या सुविधांचा गैरवापरही करतात.
सध्या दूरसंचार विभागाने सिम कार्ड धारकांच्या अशा गोष्टी लक्षात घेऊन मागील वर्षी 7 डिसेंबरला एक आदेश जारी केला होता.
दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार…
तुमच्या नावावर जर 9 पेक्षा जास्त सिम कार्ड रजिस्टर्ड असतील तर तुम्ही ताबडतोब तुमच्या सिमचे व्हेरिफिकेशन करून घ्या. 7 डिसेंबरला लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार हे काम करण्यासाठी 6 जानेवारी 2022 ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
जर तुम्ही 7 जानेवारी 2022 पूर्वी सिम कार्ड व्हेरिफिकेशन केलं नाही, तर तुमची आउटगोइंग सेवा बंद केली जाणार आहे. तुम्ही 7 जानेवारीपूर्वी त्याचे व्हेरिफिकेशन करून घ्यावी, असे न केल्यास तुमचे सिम कार्ड रद्द किंवा ब्लॉक (Sim card block) केले जाणार आहे.
तसेच, 45 दिवसांत इनकमिंग कॉल (Incoming calls) सेवा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर सिमचे व्हेरिफिकेशन झालेले नसल्यास पुढील 60 दिवसांमध्ये सिम कार्डची सुविधा पूर्णपणे बंद किंवा ब्लॉक करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.
आंतरराष्ट्रीय रोमिंग, आजारी आणि अपंग व्यक्तीं यांनाही अशा कामासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. जर तुम्ही सिम कार्डचा (Sim Card) वापर करत नसल्यास सिम सरेंडरचा (Sim Surrender) पर्याय सुद्धा तुमच्यासाठी आता उपलब्ध असणार आहे.
महत्वाचं म्हणजे, जर मोबाइल नंबरवर कोणत्याही बँक (Bank), लॉ इंफोर्समेंट किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेने तक्रार दिली तर वापरकर्त्याच्या सिमकार्डवर 5 दिवसांच्या आत आउटगोइंग कॉल बंद (Outgoing calls) केला जाईल. याशिवाय 10 दिवसांमध्ये इनकमिंग कॉल सेवाही बंद होण्याची शक्यता आहे, तर किमान 15 दिवसात सिम कार्ड पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहीती आहे.
याविषयी तुम्ही ज्या कंपनीचे सिम कार्ड वापरत आहात त्या कंपनीला कॉल करून किंवा कंपनीची सिम कार्ड सर्व्हिस देणारी एजन्सी/शॉप अशा ठिकाणी अधिक माहीती घेऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE