SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेशनकार्डच्या यादीतून तुमचे नाव वगळलंय..? घरबसल्या एका क्लिकवर चेक करता येणार..

रेशनकार्ड.. अर्थात शिधापत्रिका.. भारतीय नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा..! गोरगरीबांच्या पोटाच्या दोन वेळच्या अन्नाची सोय करणारे महत्वाचे कागदपत्र.. सरकारकडून जाहीर केल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देण्यासाठी याच दस्ताऐवजाचा वापर केला जातो..

रेशन कार्डचे तीन प्रकार… दारिद्र्यरेषेखालील लोकांना पिवळे कार्ड, अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबांना केसरी, तर दारिद्र्य रेषेवरील लोकांना पांढरे कार्ड दिले जातात. संबंधित राज्य सरकारचा लोगो रेशन कार्डवर असतो.. रेशनकार्डच्या माध्यमातून देशातील गरिबांना स्वस्त दरात धान्य मिळते.

Advertisement

आधारकार्ड येण्यापूर्वी ग्रामीण भागात रेशनकार्ड हेच ओळखपत्र म्हणून वापरले जात होते.. आजही मोठ्या प्रमाणात या कार्डचा वापर होताना दिसतो.. बऱ्याचदा काही त्रुटींमुळे रेशनकार्डच्या यादीतून नाव वगळलं जातं. रेशनकार्डमधून अशाप्रकारे नाव वगळलं गेल्यास नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

रेशन कार्डच्या यादीतून तुमचे नाव वगळले आहे की नाही, हे अगदी घरबसल्या तपासता येते. त्यासाठी काय करावे लागेल, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊ या..

Advertisement

घरबसल्या तुमचे नाव तपासा..!
रेशनकार्डच्या यादीतून नाव वगळले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी https://nfsa.gov.in/Default.aspx या अधिकृत वेबसाइटवर जा. तेथे रेशन कार्डचा पर्याय निवडा.

– आता ‘रेशनकार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल्स’ (Ration Card Details On State Portals) या पर्यायावर क्लिक करा.
– नंतर राज्य, जिल्हा निवडून ब्लॉकचे नाव टाका, नंतर पंचायतीचे नाव निवडा.

Advertisement

– तुमच्या गावातील रेशन दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्डचा प्रकार निवडा. तुमच्यासमोर रेशनकार्डधारकांच्या नावांची यादी येईल. त्यात तुम्ही तुमचे नाव पाहू शकता. ही यादी तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता. त्याद्वारे तुम्हाला तुमचे नाव यादीत आहे की नाही, याबाबतची माहिती मिळू शकेल..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement