देशातील ओडीसा येथील एका शेतकऱ्याने अजब कारणामुळे केला आहे. शेतात पाणी आणण्यासाठी आपण विजेवर चालणारी मोटार वापरतो. असता यात विशेष काही नाहीये, पण तुम्हाला शून्य रुपये खर्चात जर तुमच्या शेताला पाणी मिळत असेल, तर काय हरकत आहे ?
होय! ही खरी गोष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याची, महत्वाची आणि जुगाडू माहिती आम्ही तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध करून देत असतो. आता अशीच एक फायद्याचीही आणि तुम्ही जर शेतकरी असाल, तर जुगाड करून तुम्ही तुमचा खर्च वाचवू शकता. त्याने अशी काही युक्ती केली आहे, की त्याच्या या कल्पनेचे देशात कौतुक होतंय.
ओडीसातील मयूरभंज जिल्ह्यातील बदामतिलिया गावातील शेतकरी माहूर तीपिरिया (mahur tipiria) असे या शेतकऱ्याचे नाव असून, बांबू आणि प्लास्टिकच्या बाटल्यांच्या मदतीने त्याने आपल्या शेतात नदीतील पाणी नेले आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये त्याने विद्युत प्रवाहाचा (विजेचा) वापर केला नाही. नैसर्गिक उर्जेचा वापर करत आणि जरा शक्कल लढवून शाळेत शिक्षण न घेतलेल्या या शेतकऱ्याने प्रदूषण विरहीत पाण्याचा उपसा करण्याचे यंत्र बनवलं आहे , ज्या माध्यमातून ते नदीपासून 2 किलोमीटर दूर असणाऱ्या आपल्या शेतात थेट पाणी नेतात.
कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना विजेचा कोणताही वापर न करता त्यांनी बनवलेले हे यंत्र निसर्गास पूरक असे आहे. यामुळे निसर्गाची कोणतेच नुकसान होत नाही आणि दिवसेंदिवस ज्याची चिंता भेडसावते आहे त्या पारंपारिक उर्जेची बचतही होते आहे.
या शेतकऱ्याची कल्पकता बघण्यासाठी तुम्ही यू-ट्यूबवर 👉 ‘mahur tipiria’ हे नाव सर्च करा आणि बघा व्हिडीओ
त्या जुगाडबद्दल थोडक्यात वाचा…
शेतकरी असलेले माहूर यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा नैसर्गिक रित्या वापर करून एक चक्र बनवलं. ज्याच्यावर प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्या लावल्या आहेत आणि बांबूच्या मदतीने आपल्या शेतापर्यंत एक लाईन नेली आहे. ते चक्र नदीमध्ये बसवलंय. ते चक्र जसे फिरते तसे एक एक बाटलीमध्ये पाणी साठते. बाटलीमध्ये साठलेलं हे पाणी चक्र जसजसं वर जातं तसतसं एका पत्र्यावर पडतं. या पत्र्याची दिशा बांबूच्या लाईनला जोडली आहे. म्हणजे पत्र्यावर पडलेले पाणी थेट बांबूमध्ये जाईल आणि बांबूमधील पाणी शेताकडे वाहत जाते. या अनोख्या पद्धतीने या अनोख्या पाणी उपसा तसेच सिंचन पद्धतीमुळे हे यंत्र आता सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनले आहे. सध्याच्या काळात प्रदूषण खूप गंभीर समस्या झाली आहे. वाढत्या इलेक्ट्रिक साधनांमुळे निसर्ग धोक्यात असून अशा वेळी माहूर यांचा हा प्रयोग निसर्गास पूरक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE