SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू होणार? आजच्या बैठकीत मिनी लॉकडाऊनविषयी काय चर्चा, वाचा…

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालं असून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आधीच निर्बंध लावले असताना रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात टास्क फोर्सचे तज्ज्ञ यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

निर्बंध आणखी कठोर होणार..??

Advertisement

राज्यात आज (ता. 5 जानेवारी) सकाळी 9 वाजता तातडीने मंत्रिमंडळ बैठक झाली. अनेक महत्त्वाच्या चर्चा झाल्या. या बैठकीत राज्यात सध्या तरी मिनी लॉकडाऊन न लावता, काही निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे आज रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधांची नियमावली जारी केली जाऊ शकते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव आणि इतर महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यात नेमकी काय स्थिती आहे याचा टास्क फोर्सकडून वेळोवेळी आढावा घेतला. आज झालेल्या मंत्रालयातल्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार आहे. मग मुख्यमंत्री कोणते निर्बंध लावले जाऊ शकतात, याबाबतीत निर्णय घेणार आहेत. त्यानुसार काही कडक निर्बंध लावले जाण्याची किंवा आधीच्या निर्बंधात वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री यासंबंधी नियमावली जाहीर करू शकतात.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यामध्ये तूर्तास लॉकडाऊन लावण्याचा विचार नसणार आहे, पण निर्बंध मात्र कडक केले जाण्याची दाट शक्यता आहे, अशी चर्चा झाल्याचं समजतंय. कोरोनामुळे आधीच महाराष्ट्राचे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती पाहता सध्या लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार नाही अशी माहिती आहे.

मिनी लॉकडाऊनविषयी (Mini Lockdown) बोलायचं झालं, तर ठराविक वेळेत काही कामे करण्यासाठी वेळेचे बंधन असो किंवा लोक घराबाहेर पडण्यावर अर्थातच संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी आणखी कठोर निर्बंध असो असे काही नियम सरकार लागू करू शकते. यामुळे लॉकडाऊनविषयी (Lockdown) सध्या कोणतंही ठोस पाऊल सरकार उचलणार नसल्याचं समजतंय. सर्वात महत्वाचं म्हणजे गर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध लावले जाऊ शकतात. लोकांनी शासनाने दिलेले नियम (Corona Guidlines) पाळले तर कोरोनाबाधितांची संख्या वाढणार नाही सोबतच आर्थिक मदतीला कोणतीही कात्री लावली जाणार नाही असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला दिले आहेत. आता आज मुख्यमंत्री नियमावली जारी करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement