SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक! महिलांच्या आक्षेपार्ह फोटोंची लावली जात होती बोली, 18 वर्षीय तरुणीच निघाली मास्टरमाइंड..

बुलीबाई (Bulibai) अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली आणि मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग आला आहे.

काय आहे हे धक्कादायक प्रकरण?

Advertisement

महिलांचे सोशल मीडियावर असणारे फोटो डाऊनलोड करून किंवा सेव्ह करून ते ॲपवर अपलोड/पोस्ट करायचे आणि मग त्या फोटोंचा लिलाव करताना लोक अश्लील कमेंटही करायचे. आक्षेपार्ह टिप्पणी करणं सौदा करण्यासाठी आवाहन करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. माहीतीनुसार, 90 महिलांच्या फोटोंचा या ॲपवर घृणास्पद वापर केला गेला.

शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, तसेच इतरांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अधिक तपास झाला. याप्रकरणी पोलिसांनी सर्वात आधी बंगळुरूमधून ‘विशाल झा’ या अभियंत्याला आणि आता उत्तराखंडमधून एका तरुणीला अटक केली आहे. हीच तरुणी या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाइंड असल्याचं सांगण्यात येतंय.

Advertisement

इंटरनेट होस्टिंग व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील गिटहब (Github) नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून हे बुलीबाई ॲप (bulibai app) तयार केले गेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर मुंबई पोलिसांनी सोमवारी बंगळुरूमधून ‘विशाल झा’ या अभियंत्याला, त्यानंतर आता उत्तराखंडमधून या तरुणीला अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार

Advertisement

मुख्य आरोपी तरुणी ‘बुली बाई’ अ‍ॅपशी जोडलेली तीन अकाऊंट हाताळत होती. तरुणीला उत्तराखंडमधील रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. या तरुणीला उधम सिंग नगर जिल्ह्यातील न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं असता तिचं मुंबईला प्रत्यार्पण करण्याची परवानगी देण्यात आली.
मुंबई पोलिसांचे एक पथक उत्तराखंडमध्ये हजर असून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर तिला बुधवारी मुंबईत आणण्यात येणार आहे.

समाजमाध्यमांवरील मुस्लिम महिलांची छायाचित्रे ‘बुलीबाई ऑफ द डे’ म्हणून प्रसारित केली जात होती. अशा छायाचित्रांवर दिवसभर आक्षेपार्ह टीका-टिप्पणी करण्यात येत होती. आजवर ‘बुलीबाई ॲप’वर सुमारे 90 पेक्षा जास्त मुस्लिम महिलांवर आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दिल्लीतील एका पीडित महिला पत्रकाराने तक्रार दाखल केल्यानंतर ‘बुलीबाई ॲप’ ब्लॉक करण्यात आले. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement