SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत..! मोदी सरकारच्या भन्नाट योजनेबाबत जाणून घ्या..!

देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी सतत विविध योजना राबवित असते. आता त्यात आणखी एका योजनेची भर पडली आहे.. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या या योजनेचे नाव आहे, ‘पीएम किसान एफपीओ’ योजना..! पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर मोदी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.

Advertisement

‘पीएम किसान एफपीओ’ योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक गटाला 15 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकारकडून ही मदत दिली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषध खरेदी करणे सोपे होणार आहे..

योजनेचा लाभ कसा मिळणार..?
‘पीएम किसान एफपीओ’ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 11 शेतकऱ्यांना एकत्र येऊन एक गट, संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. त्यानंतर मोदी सरकारकडून संबंधित संस्थेला 15 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, याबाबत जाणून घेऊ या..!

Advertisement

लाॅगिंग प्रक्रिया..
– सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइट https://www.enam.gov.in/web/ वर जा.
– होम पेजवर ‘एफपीओ’ (FPO) पर्यायावर क्लिक केल्यावर समोर येणारा फॉर्म भरा.
– वापरकर्त्याचे नाव (यूजर नेम) आणि पासवर्डसह कॅप्शन कोड प्रविष्ट केल्यावर तुमचे खाते तयार होईल.

असा करा योजनेसाठी अर्ज..!
– राष्ट्रीय कृषी बाजाराच्या https://www.enam.gov.in/web/ वेबसाइटवर जा.
– होम पेजवरील ‘स्टेक होल्डर्स’ पर्यायावर ‘एफपीओ’चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
– नंतर रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करुन फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.
– नंतर स्कॅन केलेले पासबूक किंवा रद्द केलेला चेक (कॅन्सल चेक) आणि आयडी प्रूफ अपलोड करा.
– त्यानंतर ‘सबमिट’ ऑप्शनवर क्लिक करा.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement