SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेन्शनर्ससाठी खुशखबर! पेन्शनमध्ये होणार वाढ, आता प्रत्येक महिन्याला मिळू शकते ‘एवढी’ पेन्शन..

यंदा नूतनवर्षी केंद्र सरकार आपल्या ईपीएफओच्या (EPFO) पेन्शन स्कीममधील सदस्यांना एक छान भेट देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. या योजनेत मिळणाऱ्या कमीत कमी पेन्शनमध्ये आता 9 पट वाढ करण्याच्या दिशेने तयारी आता सुरू झाली आहे.

ईपीएसशी (Employees pension scheme) संबंधित सदस्यांच्या बाबतीत जर असे झाले तर त्यांना प्रत्येक महिन्याला प्रत्येकी एक हजार रुपयांऐवजी 9 हजार रुपये लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, भारत सरकारचे कामगार मंत्रालय फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या बैठकीत याविषयी निर्णय घेऊ शकते. याच बैठकीमध्ये नव्या वेज कोडबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतंय. या महत्त्वाच्या बैठकीचा मुख्य अजेंडा कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ करणे हा असेल.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या मासिक किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी केली जात होती.
संसदेच्या स्थायी समितीने मार्च 2021 मध्ये याबाबतचा सल्ला दिला होता. समितीने म्हटलं की, किमान पेन्शनच्या रकमेला सध्याच्या 1 हजार रुपयांवरून वाढवून 3 हजार रुपये केले गेले पाहिजे. मात्र पेन्शनर्सचे म्हणणे आहे की, ही रक्कम 9 हजार रुपयांपर्यंत वाढवली पाहिजे. असे होईल तेव्हाच ईपीएस-95 (EPS-95) शी संबंधित पेन्शनर्सना लाभ मिळणार आहे.

Advertisement

काही हाय कोर्टाने निवृत्ती वेतन हे मूलभूत अधिकार असल्याचे म्हटलंय तर निवृत्ती वेतनाची रक्कम थांबविता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं असलं तरी निवृत्ती वेतन हा मूलभूत अधिकार असल्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात मात्र अजूनही प्रलंबित आहे. दरम्यान आता फेब्रुवारीमध्ये याविषयी निर्णय घेण्यासाठी कामगार मंत्रालयाची एक महत्वपूर्ण बैठक होऊ शकते. तर, संसदेच्या स्थायी समितीने केलेल्या शिफारसी विषयी श्रम मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement