SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज..! जानेवारीच्या पगारात मिळणार ‘हा’ रखडलेला भत्ता..!

लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर मोदी सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक ‘गुड न्यूज’ दिली आहे.. नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात जानेवारीच्या पगारात केंद्रीय कर्मचाऱ्यांना जादा पगार मिळण्याची शक्यता आहे..

केंद्र सरकारतर्फे कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त वेगवेगळे भत्ते देण्यात येतात. त्यात कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण भत्त्याचाही (Children Education Allowance – CEA) समावेश आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांसाठी शिक्षण भत्ता दिला जातो. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एका मुलासाठी दर महिन्याला 2250 रुपये, तर दोघांसाठी 4500 रुपये शिक्षण भत्ता मिळतो..

Advertisement

कोरोना संकटामुळे देशातील शाळा दोन वर्षांपासून बंद होत्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षण भत्त्यासाठी या कर्मचाऱ्यांना अर्जच करता आला नाही.. मात्र, कोरोनामुळे मोदी सरकारने केंद्रिय कर्मचाऱ्यांना सूट दिली आहे. मुलांच्या शिक्षण भत्त्यासाठी अर्ज केलेला नसेल, तर आता जानेवारी महिन्यात त्यासाठी अर्ज करता येणार आहे.

25 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ
विशेष म्हणजे, त्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.. याआधी कर्मचाऱ्यांना मुलांचे शाळेचे प्रमाणपत्र, तसेच मुलाचे रिपोर्ट कार्ड, स्व-साक्षांकित प्रती, शुल्क पावती द्यावी लागत होती. आता कर्मचारी स्व-साक्षांकित प्रतिशिवाय रिपोर्ट कार्ड, शुल्क भरल्याचा ई-मेल अथवा ‘एसएमएस’ प्रिंटआउटद्वारे भत्ता मिळवू शकतात.

Advertisement

देशातील 25 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.. जानेवारी महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांना हे अधिकचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 4500 रुपये अधिक येऊ शकतात, मात्र त्यासाठी कर्मचाऱ्यांना एक व्हाउचर भरून द्यावा लागणार आहे.

महागाई भत्त्याची प्रतीक्षा
दरम्यान, कोरोनामुळे गेल्या 18 महिन्यांपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचा महागाई भत्ता अडकला आहे. हा भत्ता कधी मिळणार, याची वाट कर्मचाऱ्यांसह पेन्शनर्स पाहत आहेत. मात्र, लवकरच सरकार त्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement