SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मार्च महिना संपण्यापूर्वी ही कामे उरका.., नाहीतर खिशाला बसणार मोठी झळ..!

मावळत्या वर्षाला निरोप देताना, नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.. मात्र, आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना त्याचे काहीही देणं-घेणं नव्हतं.. कारण, त्यांच्यासाठी तर एप्रिलपासून खऱ्या अर्थाने नवं वर्ष सुरु होणार आहे.. कारण ‘एप्रिल टू मार्च’ असे आर्थिक वर्ष गणले जाते..

दरम्यान, मार्च महिना संपण्यापूर्वी आर्थिक बाबींचा निपटारा उरकावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्यांची आतापासूनच धावपळ सुरु झाली आहे..

Advertisement

मार्चअखेर आर्थिक बाबींशी निगडीत अनेक महत्वांच्या कामाची पुर्तता करणे आवश्यक असते. अंतिम मुदतीत ही कामे न झाल्यास, त्यावर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाण्याची शक्यता असते. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्याची पूर्तता 31 मार्चपर्यंत करावी लागणार आहे, याबाबत जाणून घेऊ या…

आयटीआर व्हेरिफाय
करदात्यांना 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचे आयकर परताव्याचे ई-व्हेरिफिकेशन (ITR Verification) 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत करावे लागणार आहे.

Advertisement

हयातीचा दाखला
मोदी सरकारने पेन्शनधारकांना 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत हयातीचा दाखला (Life Certificate) बँकेत सादर करण्यासाठी अंतिम तारीख दिली आहे. यापूर्वी ही मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती. त्यात वाढ करण्यात आली होती..

अग्रिम टॅक्स भरणे
आयकर ब्रॅकेटमध्ये (Income Tax Bracket) तुम्ही येत असल्यास, तुम्हाला वेळेवर टॅक्स भरावा लागणार आहे. त्यासाठी अग्रिम टॅक्स (Advance Tax) भरण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 पर्यंत आहे. या मुदतीत टॅक्स न भरल्यास नियमानुसार त्यावर व्याज लागू होणार आहे. अर्थात त्यातून ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यात आली आहे.

Advertisement

आधार-पॅन लिंकिंग
आधार क्रमांक पॅन क्रमांकासाठी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत मुदत आहे. हे काम मुदतीत न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होऊ शकते. शिवाय, संबधित व्यक्तीला 1 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

उशिरा आयटीआर फायलिंग
2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (Income Tax Return) रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती. या काळात रिटर्न भरलेला नसल्यास, आता विलंब शुल्क भरावा लागेल. मूळ मुदत संपल्यानंतर, बिलेटेड रिटर्न भरण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत मुदत आहे. मात्र, आता त्यासाठी 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

Advertisement

बँक केवायसी
रिझर्व्ह बँकेने केवायसी (KYC) पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 ऐवजी 31 मार्च 2022 पर्यंत मुदत दिलीय. केवायसी अंतर्गत बँक ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, आधार व पासपोर्ट अपडेट करावे लागणार आहेत.

टॅक्स सेव्हिंग केल्याची खात्री करणे
2021-22 साठी जुन्या टॅक्स प्रणालीची निवड केल्यास, 31 मार्च 2022 पर्यंत टॅक्स सेव्हिंग (Tax Saving) पर्यायाचा फायदा घेऊ शकणार आहे. सर्व सेक्शनच्या अंतर्गत असणाऱ्या टॅक्स डिडक्शन सुविधेचा लाभ घेतला आहे, याची खात्री करदात्यांना करावी लागणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement