SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : राज्यातील महाविद्यालयांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मंत्री उदय सामंत यांच्याकडून महत्वाची घोषणा..

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व ओमायक्राॅनचा धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारने येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णयही घेतला आहे..

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली.. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागणार असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मोठ्या शहरांतील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.

Advertisement

दरम्यान, राज्यातील अकृषी महाविद्यालये व तंत्रशिक्षण संस्थाबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (ता. 4) बैठक झाली. त्यानंतर आज (ता. 5) मंत्री सामंत यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला.

सामंत म्हणाले, की “कोरोनामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, या विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.”

Advertisement

“विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी कोरोनाबाधित असल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याबाबत सर्व विद्यापीठांनी दक्षता घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनाही या निर्णयाचे पालन करावे लागणार आहे,” असे ते म्हणाले.

वसतीगृहेही बंद
दरम्यान, सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांशी निगडीत वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन व निश्चित कालावधी देऊन वसतीगृहेही बंद करण्यात येणार आहेत. त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी. मात्र, परदेशी विद्यार्थ्यांची वसतीगृहाची सुविधा बंद करु नये, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement