SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

️  मंगळवार, 04 जानेवारी 2022

मेष (Aries) : विकतची दुखणी घेऊ नका. आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे.

Advertisement

वृषभ (Taurus) : विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. उगाच नसते विचार करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

मिथुन (Gemini): इतरांचा विश्वास संपादन करावा. कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल.

Advertisement

कर्क (Cancer) : प्रयत्नात कसूर करू नका. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. दुपारनंतर घरात मतभेद होतील. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल.

सिंह (Leo) :  विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. सावधगिरी बाळगून कामे करावीत. छान शौकीपणावर खर्च कराल.कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल.

Advertisement

कन्या (Virgo):  संयम आणि धिराने परिस्थिती हाताळा. दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी असेल. ठरवलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल. खर्चावर ताबा ठेवावा.

तूळ (Libra) : आरोग्याची काळजी घ्यावी. आज आपले मन खूप भाऊक बनेल.  उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. लोकांना योग्य सल्ला द्याल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) :  जबाबदारीने काम कराल. हितशत्रू माघार घेतील. आक्रमकतेने बोलू नका. अविचारी काम होऊ नये यासाठी सावध रहा.

धनु (Sagittarius) :  वादविवाद टाळा. व्यापारात लाभ होईल. मुलाबाळांबरोबर चांगले संबंध राहतील.व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. स्वभावाचा लोक गैरफायदा घेतील.

Advertisement

मकर (Capricorn) :  मदतीचा हात पुढे कराल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. भागीदारीत सबुरीने घ्यावे.

कुंभ (Aquarius) : आपल्या कामामुळे वरिष्ठ आनंदित होतील. पदोन्नतीची शक्यता वाढेल. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल.

Advertisement

मीन (Pisces) :  आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. हिशोबात चोख राहाल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय बनाल.

Advertisement