SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पुष्पा’ चित्रपटातला ‘तो’ डिलीट केलेला सीन झाला प्रदर्शित, आता पाहा संपूर्ण व्हिडीओ..

साऊथचा आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज:पार्ट-1’ हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे. या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही वाढतच आहे. अल्लू अर्जुनसोबत (Icon star Allu Arjun) नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत झळकत आहे.

‘पुष्पा-द राइज’ (pushpa: the rise) या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने कमाईच्या बाबतील अनेक जबरदस्त रेकॉर्ड केले आहेत. 300 कोटी रुपयांच्यावर या चित्रपटाने गल्ला जमवला आहे. आता चाहत्यांना एक आनंदाची बातमी आम्ही देऊ इच्छितो की, असंख्य चाहत्यांनी हा चित्रपट पाहिला असेलच, पण आता तुम्हाला आता या चित्रपटातून डिलिट केलेला एक सीन बघायला मिळणार आहे.

Advertisement

तुम्हाला माहित हवं की, पुष्पा’ हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे आणि हा भारतभर प्रदर्शित होणारा अभिनेता अल्लू अर्जुनचा पहिलाच चित्रपट आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना खास भेट दिली आहे. निर्मात्यांनी चित्रपटातील एक खास सीन प्रदर्शित केला आहे.

‘पुष्पा-द राइज’मधील अल्लू अर्जुन अभिनित एक डिलिट केलेला सीन पाहा पुढील लिंकवर 👉

Advertisement

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

‘पुष्पा’ चित्रपटाचा खास सीन त्याच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केल्यावर अल्पावधीतच चाहत्यांनी तो सोशल मीडियावर खूप व्हायरल केला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनने एका व्यक्ती कडून पैसे उधार घेतल्याचं दिसतंय आणि ती व्यक्ती घरी येऊन गावातील लोकांसमोर अल्लू अर्जुनच्या आईला शिवीगाळ करतेय. त्यानंतर अल्लू अर्जुन त्या व्यक्तीचे व्याजासहित पैसे परत करतो आणि संपूर्ण गावातल्या लोकांच्या घरी जाऊन पैसे परत केल्याचे सांगायला लावते हे दाखवण्यात आले आहे. सध्या चित्रपटातील हा सीन सोशल मीडियावर चर्चेत आहे. अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथू प्रभूने (Samantha rutu prabhu) आयटम सॉंग केलं आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास रेकॉर्डब्रेक कमाई करत आपली छाप उमटवली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement