SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी, ‘ईएसआयसी’मध्ये 3847 पदांसाठी भरती..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा निगम, अर्थात ‘ईएसआयसी’ (Employee State Insurance Corporation- ESIC)मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठी महामंडळाने अधिसूचना जारी करून या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये तब्बल 3847 पदांसाठी ही भरती होत आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षेच्या आधारांवर केली जाणार आहे. सध्या या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, परीक्षेची तारीख आणि वेळ नंतर जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

‘ईएसआयसी’मध्ये होत असलेल्या या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय, त्यासाठी कधीपर्यंत अर्ज भरायचे आहेत, ते अर्ज कुठे भरता येतील व नोकरी भरतीसंदर्भात अन्य सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

‘ईएसआयसी’मध्ये या पदांसाठी भरती
– अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
– लघुलेखक (स्टेनो)
– मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

Advertisement

एकूण पदांची संख्या – 3847

अर्ज प्रक्रिया कधी सुरु होणार : 15 जानेवारी 2022
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2022

Advertisement

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व पगार
अप्पर डिव्हिजन क्लर्क
: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. 18 ते 27 वयोमर्यादा, वेतन- 25,500-81,100 पर्यंत (सातव्या वेतन आयोगानुसार).

स्‍टेनोग्राफर : उमेदवार बारावी पास असावा, टायपिंग चांगले असावे. वेतन- 25,500-81,100 पर्यंत (सातव्या वेतन आयोगानुसार).

Advertisement

मल्टी टास्किंग स्टाफ : उमेदवार दहावी पास असावा. 18 ते 25 वयोमर्यादा, वेतन- 18,000-56,900 पर्यंत (सातव्या वेतन आयोगानुसार)

येथे करा ऑनलाईन अर्ज – www.esic.nic.in

Advertisement

असा करा अर्ज..?
– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यावर तुमची नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा आणि सेव्ह करा.
– तुमचा फॉर्म सत्यापित करण्यास विसरू नका. नंतर ‘सेव्ह व नेक्स्ट’ (Save & Next) बटण दाबा.
– परीक्षा शुल्क भरा
– डॉक्युमेंट स्कॅन करुन अपलोड करा.

अर्जासाठी फी
– एससी/एसटी/पीडब्लूडी/विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि एक्स-सर्व‍िसमेन : 250 /-
– बाकी श्रेणी : 500 /-

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement