SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता विना इंटरनेट एकमेकांना पैसे पाठविता येणार..! रिझर्व्ह बॅंकेचा महत्वपूर्ण निर्णय..

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ग्रामीण भागात, दुर्गम ठिकाणी डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठी निर्णय घेतलाय..

‘आरबीआय’ने (RBI) सोमवारी (ता. 3) ऑफलाइन डिजिटल पेमेंट्स (Offline Digital Payments) बाबत रुपरेषा जारी केली. त्यानुसार, सध्या ऑफलाईन 200 रुपयांपर्यंत एक ट्रान्झॅक्शन करण्यास ‘आरबीआय’ने मंजुरी दिली आहे. असे जास्तीत जास्त 10 ट्रान्झॅक्शन करता येणार आहे, म्हणजेच 2000 रुपयांपर्यंत व्यवहाराची मर्यादा असणार आहे.

Advertisement

विना इंटरनेट ग्राहकांना एका वेळी 200 रुपयांचा व्यवहार करता येईल. कार्ड, वॉलेट व मोबाइलसह कोणत्याही मार्गाने ऑफलाइन पेमेंट करता येणार आहे. त्यासाठी ‘फेस टू फेस’ तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. अर्थात त्यासाठी दोन्ही पक्षांची उपस्थिती आवश्यक आहे.

सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ऑफलाइन पेमेंट सुरु केले होते. त्या अभिप्रायानुसार, हा आराखडा तयार केला आहे. ऑफलाईन ट्रान्झॅक्शनसाठी ‘अॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’ची गरज नाही. ग्राहकांना ‘एसएमएस’ किंवा ‘ई-मेल’द्वारे मिळणारा ‘अलर्ट’ उशिरा मिळणार असल्याचे ‘आरबीआय’ने सांगितले..

Advertisement

व्यवहार कसा होणार..?
– रिझर्व्ह बँकेने किमान 200 रुपयांचे व्यवहार ऑफलाईन केले आहेत.
– एका वेळी 200 रुपये असे 10 व्यवहार करता येणार आहेत.
– व्यवहार करताना दोन्ही पक्षांची उपस्थिती आवश्यक असेल..

– ग्राहकाच्या अनुमतीशिवाय हा व्यवहार पूर्ण होणार नाही.
– ऑफलाईन व्यवहारासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाईल वॅलेट आणि मोबाईल डिव्हाइसचा वापर होईल.
– दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत हा व्यवहार संपूर्ण सुरक्षित असेल.
– संपूर्ण व्यवहारासाठी इंटरनेट सेवेची आवश्यकता नाही.

Advertisement

डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन
‘ग्राहकांच्या परवानगीनंतरच ‘ऑफलाइन पेमेंट’चा वापर करता येईल.. या योजनेमुळे इंटरनेट सेवा विस्कळित असलेल्या ठिकाणी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल. गावे नि छोट्या शहरांमध्ये ही व्यवस्था तात्काळ लागू करणार असल्याचे सांगण्यात आले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement