SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या घरातील महिलेला मिळणार 6 हजार रुपये..! मोदी सरकारची महत्वाकांक्षी याेजना..

विविध समाजघटकांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना सुरु करण्यात येतात. मात्र, त्याचा प्रचार व प्रसार योग्यरित्या होत नसल्याने अनेकांना या योजनांबाबत काहीच माहिती नसते. परिणामी, काही ठराविक वर्ग सोडले, तर योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोचतच नाही. त्यातून सरकारचा उद्देशही साध्य होत नाही..

अशाच काही याेजनांपैकी एक योजना आहे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना..! केंद्र सरकारतर्फे देशातील गरोदर महिलांसाठी ही योजना राबविण्यात येते. मोदी सरकारने 1 जानेवारी 2017 रोजी ही योजना सुरू केली होती. परंतु, देशातील बहुतांश गरोदर महिलांना या याेजनेबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसते..

Advertisement

कोणाला मिळतो लाभ..?
‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या महिला, तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना 6 हजार रूपयांची मदत केली जाते. चार हप्त्यांमध्ये ही मदत थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात दिली जाते..

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
मोदी सरकारने खास गर्भवती महिलांसाठी ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ ही योजना सुरु केली होती. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून गर्भवती महिला अर्ज करू शकतात. त्यासाठी आई-वडिलांचे आधार कार्ड, आई-वडिलांचे ओळखपत्र, बाळाचा जन्माचा दाखला आणि बॅंक खात्याच्या पासबूकची गरज असते..

Advertisement

‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ (Pradhan Mantri Matrutva Vandana Yojana) या योजना सुरु करण्यामागे मोदी सरकारचा मोठा उदात्त दृष्टीकोन आहे. नवजात बाळाची सदृढरित्या वाढ व्हावी, त्याचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी बाळाला व त्याच्या आईला सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती.

असे मिळतात पैसे..!
केंद्र सरकारकडून आई नि बाळासाठी हे पैसे मिळतात. त्यातून नवजात बाळाला योग्य आहार दिला जावा, अशी अपेक्षा आहे. मोदी सरकार हे पैसे चार टप्प्यांमध्ये देते. पहिला हप्ता एक हजार रूपये, दुसरा हप्ता दोन हजार, तिसरा हप्ता दोन हजार आणि शेवटच्या हप्त्यात एक हजार रुपये दिले जातात. त्यातील शेवटचा हप्ता बाळाच्या जन्मावेळी रुग्णालयात दिला जातो.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement