टेस्ट-वन-डे पासून आयपीएल-वर्ल्डकपपर्यंत 2022 वर्षाचे संपूर्ण वेळापत्रक, टीम इंडिया कोणासोबत भिडणार, जाणून घ्या..
भारतीय क्रिकेट संघाला (Indian cricket team timetable 2022) यंदा 2022 साली खूप सामने खेळायचे आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत सध्या खेळत आहे आणि हा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतून काही सामन्यांना सुरुवात होणार आहे. 2022 वर्ष सुरू होत असताना, टीम इंडियाच्या यावर्षी होणाऱ्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या..
दक्षिण आफ्रिका दौरा 2021-22 वेळापत्रक
▪️ 3-7 जानेवारी: दुसरी कसोटी, जोहान्सबर्ग
▪️ 11-15 जानेवारी: तिसरी कसोटी, केपटाऊन
▪️ 19 जानेवारी: पहिला वनडे, पार्ल
▪️ 21 जानेवारी: दुसरी वनडे, पार्ल
▪️ 23 जानेवारी: तिसरी वनडे, केपटाऊन
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज 2022 वेळापत्रक
▪️ 6 फेब्रुवारी: पहिला वनडे, अहमदाबाद
▪️ 9 फेब्रुवारी: दुसरी वनडे, जयपूर
▪️ 12 फेब्रुवारी: तिसरी वनडे, कोलकाता
▪️ 15 फेब्रुवारी: पहिला टी-20, कटक
▪️ 18 फेब्रुवारी : दुसरी टी-20, विशाखापट्टणम
▪️ 20 फेब्रुवारी: तिसरा टी-20, तिरुवनंतपुरम
श्रीलंका दौरा 2022
▪️ 25 फेब्रुवारी-1 मार्च: पहिली कसोटी, बेंगलोर
▪️ 5-9 मार्च: दुसरी कसोटी, मोहाली
▪️ 13 मार्च: पहिला ती-20, मोहाली
▪️ 15 मार्च: दुसरा टी-20, धर्मशाला
▪️ 18 मार्च: तिसरी टी-20, लखनौ
इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league -IPL)
आयपीएलसाठी एप्रिल आणि मे महिना संपूर्ण बुक असेल. अधिकचे दोन संघ जोडले गेले असता लीग संपण्यास उशीर होईल. ही टी-20 स्पर्धा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपण्याचा अंदाज आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा
▪️ 9 जून: पहिला टी-20, चेन्नई
▪️ 12 जून: दुसरी टी-20, बेंगलोर
▪️ 14 जून: तिसरी टी-20, नागपूर
▪️ 17 जून: चौथी टी-20, राजकोट
▪️ 19 जून: पाचवा टी-20, दिल्ली
भारताचा इंग्लंड दौरा
▪️ 1-5 जुलै: पाचवी कसोटी (Test match), बर्मिंगहॅम (भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. संघाला 2021 व्या वर्षी याआधी राहिलेला पाचवा कसोटी सामना खेळायचा आहे.)
▪️ 7 जुलै: पहिला टी-20, साउथम्पटन
▪️ 9 जुलै: दुसरी टी-20, बर्मिंगहॅम
▪️ 10 जुलै: तिसरा टी-20, नॉटिंगहॅम
▪️ 12 जुलै: पहिला वनडे, लंडन
▪️ 14 जुलै: दुसरा वनडे, लंडन
▪️ 17 जुलै: तिसरी वनडे, मँचेस्टर
वेस्ट इंडिज दौरा आणि आशिया कप (Asia Cup)
यंदाच्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये 3 एकदिवसीय आणि तितक्या T20 सामन्यांसाठी टीम इंडिया कॅरेबियन दौऱ्यावर जाईल. विंडीज दौऱ्यानंतर हे खेळाडू सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत सहभागी होतील. भारत मागील स्पर्धेचा गतविजेता असून या स्पर्धेतुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टक्कर पाहायला मिळेल. ही स्पर्धा श्रीलंकेत होणार आहे.
टी-20 विश्वचषक (T-20 Worldcup) आणि बांगलादेश दौरा
भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषक झाल्यानंतर टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात जाईल. तसेच, विशेष म्हणजे या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची झलक पाहायला मिळू शकते. आयसीसी (ICC) स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार असल्याची माहीती आहे. भारत टी-20 वर्ल्ड कपनंतर 2 टेस्ट मॅच आणि 3 वनडे मॅचसाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. येत्या काही महिन्यांत या मालिकेच्या अधिकृततारखाही जाहीर केल्या जाणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE