SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवीन वर्षात कोणता सण कधी? कोणते व्रत, उपवास, जयंती, मुहूर्त कधी? वाचा 2022 चं संपूर्ण कॅलेंडर…

भारतात गेल्या वर्षी अनेक सण, उत्सव, महत्वाचे दिवस यांवर कोरोनामुळे बंधनं आली, त्यामुळे लोकांचा उत्साह कमी दिसला. यावर्षीही अशीच परिस्थिती आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते आणि वर्ष 31 डिसेंबरला संपत असते. आता नवीन वर्षास प्रारंभ झाला आहे.

जर तुम्हाला नवीन वर्षाचे व्रत, जयंती, एकादशी, चतुर्थी, मुहूर्त, पौर्णिमा, अमावस्या आणि सण-उत्सव बाबतीत नेहमी माहीत करून घ्यायचं असेल, तर जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यानची संपूर्ण यादी (New Year 2022 Calendar) जाणून घ्या..

Advertisement

▪️ जानेवारी 2022

01 जानेवारी शनिवार: मासिक शिवरात्री
02 जानेवारी रविवार: पौष अमावस्या
13 जानेवारी गुरुवार: पौष पुत्रदा एकादशी, लोहरी
14 जानेवारी शुक्रवार: पोंगल, उत्तरायण, मकर संक्रांती
15 जानेवारी शनिवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष)
17 जानेवारी सोमवार: पौष पौर्णिमा
21 जानेवारी शुक्रवार: संकष्टी चतुर्थी
26 जानेवारी बुधवार: प्रजासत्ताक दिन
28 जानेवारी शुक्रवार: शतिला एकादशी
30 जानेवारी रविवार: मासिक शिवरात्री

Advertisement

▪️ फेब्रुवारी 2022

01 फेब्रुवारी मंगळवार: माघ अमावस्या
05 फेब्रुवारी शनिवार: बसंत पंचमी, सरस्वती पूजा
12 फेब्रुवारी शनिवार: जया एकादशी
13 फेब्रुवारी रविवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष), कुंभ संक्रांती
16 फेब्रुवारी बुधवार: माघ पौर्णिमा व्रत
20 फेब्रुवारी रविवार: संकष्टी चतुर्थी
27 फेब्रुवारी रविवार : विजया एकादशी
२८ फेब्रुवारी सोमवार : प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)

Advertisement

▪️ मार्च 2022

01 मार्च मंगळवार: महाशिवरात्री, मासिक शिवरात्री
02 मार्च बुधवार: फाल्गुन अमावस्या
14 मार्च सोमवार: अमलकी एकादशी
15 मार्च मंगळवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष), मीन संक्रांती
17 मार्च गुरुवार: होलिका दहन
18 मार्च शुक्रवार: होळी, फाल्गुन पौर्णिमा व्रत
21 मार्च सोमवार: संकष्टी चतुर्थी
28 मार्च सोमवार: पापमोचिनी एकादशी
29 मार्च मंगळवार: प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)
30 मार्च बुधवार: मासिक शिवरात्री

Advertisement

▪️ एप्रिल 2022

01 एप्रिल शुक्रवार: चैत्र अमावस्या
02 एप्रिल शनिवार: गुढी पाडवा
10 एप्रिल रविवार: राम नवमी
11 एप्रिल सोमवार: चैत्र नवरात्री पारण
12 एप्रिल मंगळवार: कामदा एकादशी
14 एप्रिल गुरुवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष), मेष संक्रांती
16 एप्रिल शनिवार: हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा व्रत
19 एप्रिल मंगळवार: संकष्टी चतुर्थी
26 एप्रिल मंगळवार: वरुथिनी एकादशी
28 एप्रिल गुरुवार: प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)
29 एप्रिल शुक्रवार: मासिक शिवरात्री

Advertisement

▪️ मे 2022

03 मे मंगळवार: अक्षय्य तृतीया
12 मे गुरुवार: मोहिनी एकादशी
13 मे शुक्रवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष)
15 मे रविवार: वृषभ संक्रांती
16 मे सोमवार: वैशाख पौर्णिमा व्रत
19 मे गुरुवार: संकष्टी चतुर्थी
26 मे गुरुवार: अपरा एकादशी
27 मे शुक्रवार : प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)
28 मे शनिवार: मासिक शिवरात्री
30 मे सोमवार: ज्येष्ठ अमावस्या

Advertisement

▪️ जून 2022

5 जून रविवार : जागतिक पर्यावरण दिन
6 जून : शिवराज्याभिषेक सोहळा -किल्ले रायगड
11 जून शनिवार: निर्जला एकादशी
12 जून रविवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष)
14 जून मंगळवार: वटपौर्णिमा
15 जून बुधवार: मिथुन संक्रांती
17 जून शुक्रवार: संकष्टी चतुर्थी
24 जून शुक्रवार: योगिनी एकादशी
27 जून सोमवार: मासिक शिवरात्री
29 जून बुधवार: आषाढ अमावस्या

Advertisement

▪️ जुलै 2022

01 जुलै शुक्रवार: जगन्नाथ रथयात्रा
10 जुलै रविवार: देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी
11 जुलै सोमवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष)
13 जुलै बुधवार: गुरु-पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा व्रत
16 जुलै शनिवार: संकष्टी चतुर्थी,
24 जुलै रविवार: कामिका एकादशी
25 जुलै सोमवार: प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)
26 जुलै मंगळवार: मासिक शिवरात्री
28 जुलै गुरुवार: श्रावण अमावस्या

Advertisement

▪️ऑगस्ट 2022

02 ऑगस्ट मंगळवार: नागपंचमी
08 ऑगस्ट सोमवार: श्रावण पुत्रदा एकादशी
9 ऑगस्ट मंगळवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष), मोहरम (ताजिया)
11 ऑगस्ट गुरुवार: रक्षा बंधन, नारळी पौर्णिमा
12 ऑगस्ट शुक्रवार: श्रावण पौर्णिमा व्रत
14 ऑगस्ट रविवार : काजरी तीज
15 ऑगस्ट, सोमवार: स्वातंत्र्यदिन, संकष्टी चतुर्थी दिवस, पतेती
17 ऑगस्ट बुधवार: सिंह संक्रांती
18 ऑगस्ट गुरुवार: श्रीकृष्ण जयंती (उपवास)
19 ऑगस्ट शुक्रवार: जन्माष्टमी (गोपाळकाला)
23 ऑगस्ट मंगळवार: भागवत एकादशी
24 ऑगस्ट बुधवार: प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)
25 ऑगस्ट गुरुवार: मासिक शिवरात्री
27 ऑगस्ट शनिवार: भाद्रपद अमावस्या
30 ऑगस्ट मंगळवार: हरतालिका तीज
31 ऑगस्ट बुधवार: श्रीगणेश चतुर्थी

Advertisement

▪️सप्टेंबर 2022

01 सप्टेंबर सोमवार: ऋषीपंचमी
06 सप्टेंबर मंगळवार: परिवर्तनिनी एकादशी
08 सप्टेंबर गुरुवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष), ओणम/तिरुवोणम
09 सप्टेंबर शुक्रवार: अनंत चतुर्दशी
10 सप्टेंबर शनिवार: भाद्रपद पौर्णिमा व्रत
13 सप्टेंबर मंगळवार: अंगारक संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 8.47)
17 सप्टेंबर शनिवार: कन्या संक्रांती
21 सप्टेंबर बुधवार: एकादशी
23 सप्टेंबर शुक्रवार: प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)
24 सप्टेंबर शनिवार: मासिक शिवरात्री
25 सप्टेंबर रविवार: अश्विन अमावस्या
26 सप्टेंबर सोमवार: शारदीय नवरात्री, घटस्थापना

Advertisement

▪️ ऑक्टोबर 2022

01 ऑक्टोबर शनिवार: कल्पपरंभ
02 ऑक्टोबर रविवार: नवपत्रिका पूजा, गांधी जयंती
03 ऑक्टोबर सोमवार: दुर्गा महाष्टमी पूजा
04 ऑक्टोबर मंगळवार: दुर्गा महा नवमी पूजा, शारदीय नवरात्र पारण
05 ऑक्टोबर बुधवार: दुर्गा विसर्जन, दसरा
06 ऑक्टोबर गुरुवार: पापंकुशा एकादशी
07 ऑक्टोबर शुक्रवार : प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष)
09 ऑक्टोबर रविवार: अश्विन पौर्णिमा व्रत
13 ऑक्टोबर गुरुवार: संकष्टी चतुर्थी, करवा चौथ
17 ऑक्टोबर सोमवार: तूळ संक्रांती
21 ऑक्टोबर शुक्रवार: रमा एकादशी
22 ऑक्टोबर शनिवार: प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)
23 ऑक्टोबर रविवार: सोम रविवार शिवरात्री, धनत्रयोदशी
24 ऑक्टोबर सोमवार: दिवाळी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन
25 ऑक्टोबर मंगळवार: कार्तिक अमावस्या
26 ऑक्टोबर बुधवार: भाई दूज, गोवर्धन पूजा
30 ऑक्टोबर रविवार: छठ पूजा

Advertisement

▪️नोव्हेंबर 2022

04 नोव्हेंबर शुक्रवार: देवुत्थान एकादशी
05 नोव्हेंबर शनिवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष)
08 नोव्हेंबर मंगळवार: कार्तिक पौर्णिमा व्रत, गुरुनानक जयंती
12 नोव्हेंबर शनिवार: संकष्टी चतुर्थी
16 नोव्हेंबर बुधवार : वृश्चिका संक्रांती
20 नोव्हेंबर रविवार: उत्पण्णा एकादशी
21 नोव्हेंबर सोमवार : प्रदोष व्रत (कृष्ण पक्ष)
22 नोव्हेंबर मंगळवार: मासिक शिवरात्री
23 नोव्हेंबर बुधवार: मार्गशीर्ष अमावस्या

Advertisement

▪️ डिसेंबर 2022

03 डिसेंबर शनिवार: मोक्षदा एकादशी
05 डिसेंबर सोमवार: प्रदोष व्रत (शुक्ल पक्ष)
07 डिसेंबर बुधवार: श्रीदत्त जयंती
08 डिसेंबर गुरुवार: मार्गशीर्ष पौर्णिमा व्रत
11 डिसेंबर रविवार: संकष्टी चतुर्थी
16 डिसेंबर शुक्रवार: धनु संक्रांती
19 डिसेंबर सोमवार: सफाळा एकादशी
21 डिसेंबर (शुक्ल पक्ष) बुधवार: सफला एकादशी
21 डिसेंबर (शुक्ल पक्ष) मासिक शिवरात्री
23 डिसेंबर शुक्रवार: पौष अमावस्या
25 डिसेंबर रविवार: ख्रिसमस
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement