SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बायोडेटा, सीव्ही आणि रेझ्युमेमध्ये नेमका फरक काय? मुलाखतीला जाण्यापूर्वी प्रत्येकाला माहीती हवं..

अपल्यातलील बरेच जण मुलाखतीला (interview) गेले आहेत किंवा काही जाणार आहेत. तर तुम्हाला आजच्या काळात बायोडेटा नंतर रेझ्युमे हा शब्द जास्त ऐकू आला असेल. मुलाखतीला तुम्ही तुमच्याबद्दलची सर्व माहीती बायोडेटा किंवा CVच्या स्वरुपात देतात. पण तुम्हाला माहीती आहे काय, बायोडेटा, CV आणि Resume, मग यामधील योग्य शब्द कोणता?

Biodata, CV आणि Resume बद्दल जाणून घ्या..

Advertisement

लक्षात ठेवा की, बायोडेटा, सीव्ही आणि रेझ्युमे या तिन्ही गोष्टीत फरक आहेत. रेझ्युमेमध्ये विशेषतः उमेदवाराचे शिक्षण, अनुभव व निवडक कौशल्ये अशीची माहिती असते. प्रोफाईलबद्दल खूप जास्त तपशील दिलेला नसतो. ते फक्त 1 किंवा 2 पानांचे असते. तुम्ही त्यामध्ये लिंग, वडिलांचे नाव, राष्ट्रीयत्व, जन्मतारीख, छंद याविषयी माहीती देण्याची आवश्यकता नसते.

रेझ्युमेनंतर सीव्ही म्हणजे CURRICULUM VITAE हा लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ जीवनक्रम असा आहे. रेझ्युमेपेक्षा यामध्ये अधिक माहिती दिली असते. रेझ्युमेमध्ये दिलेल्या माहितीसोबतच यामध्ये त्यामध्ये विशेष कौशल्ये, पूर्वीचा अनुभव आणि प्रोफाईलची माहिती देता येते. सहसा ते 3 पानाचे करू शकतात किंवा तुम्ही तुम्हाला जितका जास्त अनुभव असेल, त्यानुसार पान वाढवता येतात.

Advertisement

बायोडेटा हा आपण सर्वात जास्त ऐकलेला शब्द आहे. त्याचा अर्थ बायोग्राफिकल डेटा असा आहे. बायोडेटा हा 80 आणि 90 च्या दशकात अधिक वापरला जात होता. साधारणपणे, उमेदवाराची प्राथमिक किंवा प्रामुख्याने वैयक्तिक माहिती बायोडाटामध्ये दिली जाते. यामध्ये उमेदवाराची जन्मतारीख, धर्म, लिंग, पत्ता आणि तो विवाहित आहे की, नाही यासारख्या माहितीचा समावेश आहे. खर्‍या अर्थाने त्याचा उपयोग विविध नोकऱ्यांसाठीही केला जातो.

जगात सध्या व्हिडीओ रेझ्युमेचा ट्रेंड आहे. अनेक कंपन्या उमेदवाराला व्हिडीओ रेझ्युमे पाठवायला सांगतात. हा एक प्रकारचा व्हिडीओ आहे. यामध्ये एक ते दोन मिनिटांमध्ये तुम्हाला स्वतःबद्दल, अनुभवाबद्दल आणि कौशल्यांबद्दल माहिती द्यावी लागेल. त्यामुळे हा व्हिडीओ बनवताना तुम्हाला काय म्हणायचे आहे ते क्रमाने ठरवा आणि ते रेकॉर्ड करा, म्हणजे तुमची मुलाखत छान पद्धतीने पार पडेल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement