SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुलाची उंची वाढत नसल्याने हैराण..! या सूत्राने समजणार मुलाची उंची किती होणार..?

अनेक पालकांना आपल्या मुलाची उंची निट वाढेल का, ते मोठे झाल्यावर बुटके तर राहणार नाही, याची काळजी लागलेली असते. सध्या अनेक मुलांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. मुलांची उंची अजिबात न वाढणे किंवा खूप कमी वेगाने वाढत असल्याचे समोर आलेय. कमी उंची असल्यास मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याचीही शक्यता असते…

आपले व्यक्तीमत्व आकर्षक असावे, असे कोणाला वाटत नाही. त्यासाठी आवश्यक असते, ते म्हणजे रंग, रुप नि अर्थातच पुरेशी उंची..! कमी उंची असणारे किंवा बुटक्या मुलांना अनेकदा त्याचा न्युनगंड येतो..

Advertisement

साधारणपणे वयाच्या 18व्या वर्षापर्यंत उंची वाढते.. त्यानंतर उंचीला ब्रेक लागत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मुलाचे वय वाढत असताना, त्याच्या वाढीकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवे.. मात्र, त्याआधी मुलाच्या उंचीची कल्पना यायला हवी..

तुम्हालाही आपल्या मुलाच्या उंचीची काळजी वाटत असेल, तर काही खास सूत्रांद्वारे मुलाची उंची किती वाढू शकते, याचा अंदाज घेऊ शकता.. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

आपल्या शरीरातील पिट्युटरी ग्रंथी शरीरात वाढ हार्मोन तयार करतात. त्यातून आपली उंची ठरत असते. कधीकधी आपल्या शरीरातील काही कमतरता या वाढीच्या हार्मोन्सवर परिणाम करतात, त्याचा उंचीवर परिणाम होतो..

सूत्री क्रमांक एक
तुम्हाला मुलाच्या उंचीचा अंदाज घ्यायचा असेल, तर आई-वडिलांनी त्यांची उंची सेेंटीमीटर किंवा इंचात मोजावी. मुलाच्या उंचीचा अंदाज घेण्यासाठी त्यात 5 अधिक जोडा आणि मुलीच्या उंचीतून 5 वजा करा. मिळालेल्या संख्येला 2 ने भागा.. तुम्हाला मुलाच्या उंचीचा अंदाज येईल..

Advertisement

फाॅर्म्युला नंबर दोन
मुलीच्या उंचीचा अंदाज घेण्यासाठी ती 18 महिन्यांची झाल्यावर तिची उंची दुप्पट करा, मुलाच्या उंचीचा अंदाज घेण्यासाठी तो दोन वर्षांचा झाल्यावर त्याची उंची दुप्पट करा. त्यातून तुम्हाला आपल्या मुला-मुलींच्या उंचीचा अंदाज घेता येईल. अर्थात, या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही..

कोणाशी तुलना नको
मुलांची उंची आनुवांशिकतेवर अवलंबून असते. प्रत्येक मुलाची वाढ वेगळ्या प्रकारे होते. त्यामुळे इतर मुलांसाेबत त्याची तुलना करु नका. कारण, मुलांचा शारीरिकच नव्हे, तर मानसिक विकासही याच काळात होत असतो. त्यामुळे इतर मुलांसोबत त्यांची तुलना केल्यास त्यांच्यात न्युनगंड येण्याची शक्यता असते..

Advertisement

अशी वाढवा उंची..!
मुलाची उंची व वाढ होण्यासाठी काही व्यायाम प्रकार व आहार महत्वाचा असतो. वाढत्या वयातील मुलांना योग्य प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन्स, जीवनसत्वे असणारा आहार देण्याची गरज आहे.. त्यामुळे त्यांना पोषक आहार दिल्यास मुलांचा शारीरिक व मानसिक विकासही चांगला होईल..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement