SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एमपीएससी’चे सुधारित वेळापत्रक जाहीर..! परीक्षांच्या तारखांवरुन विद्यार्थ्यांमध्ये नाराजी..!

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे वयाेमर्यादा ओलांडली गेल्याने अनेक उमेदवारांना ‘एमपीएससी’ची दारे कायमची बंद झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला. त्यामुळे 2 जानेवारी 2022 रोजी होणारी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर गेली. वयोमर्यादा ओलांडून गेलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

Advertisement

दरम्यान, आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी या परीक्षा कधी होणार, हे गुलदस्त्यातच ठेवले होते. मात्र, आता आयोगाने या परीक्षांच्या तारखांवरील पडदा हटविला असून, पुन्हा एकदा परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे..

Advertisement

राज्यसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, अशा तिन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. तसेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून परीक्षेच्या सुधारित तारखांची माहिती दिली आहे.

परीक्षेचे सुधारित वेळापत्रक

Advertisement

राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 1 जानेवारी 2022
सुधारित तारीख -23 जानेवारी 2022

Advertisement

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा , संयुक्त पेपर क्र 1

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 22 जानेवारी 2022
सुधारित तारीख – 29 जानेवारी 2022

Advertisement

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा2020, पेपर क्र -2 पोलिस उपनिरीक्षक

यापूर्वी निश्चित केलेली तारीख – 29 जानेवारी 2022
सुधारित तारीख – 30 जानेवारी 2022

Advertisement

एकाच दिवशी दोन परीक्षा
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या परीक्षांच्या या तारखांवरुन पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. ‘एमपीएससी’च्या पोलिस निरीक्षक पदासाठी येत्या 29 जानेवारीला परीक्षा होणार आहे, मात्र त्याच दिवशी ‘म्हाडा'(Mhada)ची पुढे ढकललेली परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने राज्यातील विद्यार्थी गोंधळात पडले आहेत.

राज्यात 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान ‘म्हाडा’ची परीक्षा होत आहे. पेपर फुटल्याच्या आरोपामुळे ‘म्हाडा’ची 12 ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता ‘एमपीएससी’ व ‘म्हाडा’ची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. परीक्षांच्या तारखा जाहीर करताना, इतर विभागाचे वेळापत्रक लक्षात घेतलं नसल्याचा आरोप होत आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement