SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एटीएम चार्ज न भरता कितीही वेळा काढा पैसे..! या दोन मार्गांनी विनाशुल्क पैसे काढता येणार..

नव्या वर्षात अनेक गाेष्टींमध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागाईने वैतागलेल्या नागरिकांसाठी नव्या वर्षातही खिशाचा भार काही हलका झाल्याचे दिसत नाही. काही सेवांसाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.. त्यापैकीच एक म्हणजे, एटीएम सेवा..!

देशभरातील बॅंकांनी नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून ‘एटीएम’ वापराच्या नियमांत मोठ्या प्रमाणात बदल केले. त्यामुळे आता महिनाभरात किती वेळा ‘एटीएम’चा वापर केला, हे नागरिकांना चांगलेच लक्षात ठेवावे लागणार आहे, अन्यथा खिशाला झळ बसलीच म्हणून समजा..!

Advertisement

रिझर्व्ह बँकेने ‘एटीएम’च्या मोफत व्यवहारांची लिमिट संपल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्यास मंजुरी दिलीय. याआधी मोफत लिमिट संपल्यावर प्रत्येक ट्रान्झेक्शनसाठी 20 रुपये शुल्क आकारले जायचे, ते आता 21 रुपये व ‘जीएसटी’ असे केले आहे. मात्र, हे शुल्क न भरताही अधिक वेळा पैसे काढू शकता. त्यासाठी काय करायचे, हे जाणून घेऊ या..

मायक्रो एटीएम वापरा..!
मायक्रो ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पण त्याआधी ‘मायक्रो एटीएम’ म्हणजे काय, हे समजून घेऊ या..

Advertisement

‘मायक्रो एटीएम’ म्हणजे दुकानांमध्ये असलेले ‘पीओएस’ (POS) मशीन..! काही बँकांनी ‘मायक्रो एटीएम’वर पैसे काढण्याची सुविधा काही दुकानांना दिली आहे. अशा ठिकाणी पैसे काढता येणार आहेत. मात्र, त्यासाठी अट एकच, दुकानदार ओळखीचा पाहिजे.. अनोळखी ठिकाणी गेल्यास ही अडचण होऊ शकते..!

आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टिम…
बँका किंवा अन्य आर्थिक संस्था फिंगरप्रिंट आणि मोबाईल नंबरच्या मदतीने पैसे काढून देतात. ‘एनपीसीआय’ने ही सुविधा तयार केली आहे. त्यासाठी ‘आधार’द्वारे विश्वासार्हता प्राप्त होते. त्यासाठी डेबिट वा क्रेडिट कार्डची गरज नाही. मात्र, तुमचे खाते ‘आधार’शी लिंक असायला हवे. हे एकप्रकारे स्वाईप मशीनसारखेच असते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement