SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेबाबत मोठा खुलासा, हेलिकाॅप्टर क्रॅश होण्यामागील कारण आले समोर..!

काही दिवसांपूर्वीच अवघ्या भारताला हादरवणारी बातमी समोर आली होती. कर्नाटक-तमिळनाडू सीमेवरील कुन्नूर परिसरात भारतीय हवाई दलाचे IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, आता या दुर्घटनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचे मोठे कारण समोर आले आहे.

Advertisement

हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या कमिटीने ही चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर केला आहे. हवाई दलाने या अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नसले, तरी अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागील कारण समोर आलेय..

हे आहे दुर्घटनेमागील कारण..
कमिटीने अहवालात म्हटले आहे, की खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला ‘Controlled Flight Into Terrain’ (CFIT) असे म्हणतात. आता हा अहवाल कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठविण्यात आला असून, लवकरच तो वायुसेना प्रमुखांकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते..

Advertisement

हेलिकाॅप्टर दुर्घटनेबाबत..
वेलिंग्टन येथे लष्कराचे काॅलेज आहे. या काॅलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत हे भाषण देण्यासाठी आपल्या पत्नीसह हवाई दलाच्या हेलिकाॅप्टरने गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही होते. वेलिंग्टनवरुन कुन्नूरला जाताना त्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते.

या घटनेत हेलिकाॅप्टरमधील सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नीसह लष्करातील 14 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे अवघा देश हळहळला होता. अखेर या घटनेमागील कारण समोर आले आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement