SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विराट कोहलीचे दिवस फिरले..! सचिनच्या बेस्ट टीममध्येही स्थान नाही.. अशी आहे सचिनची प्लेईंग-11..

सध्या ‘टीम इंडिया’चा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचे दिवस फिरलेले दिसत आहेत.. टी-20 संघाचे कर्णधार पद सोडण्याचा त्याच्या निर्णयानंतर वन-डे कर्णधार पदावरुनही त्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर सुरु झालेला वाद अजूनही सुरुच आहे..

दुसरीकडे विराट कोहलीची बॅटही त्याच्यावर रुसलेली दिसत आहे. मागील पूर्ण वर्षभरात त्याच्याकडून एकही शतक ठोकले गेले नाही. त्यामुळे रॅंकिंगमध्येही त्याची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे..

Advertisement

अशातच क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या मास्टर ब्लॅस्टर सचिन तेंडुलकर याने त्याची जगातील बेस्ट- 11 टीमची नुकतीच निवड केलीय.. मात्र, सचिनच्या या टीममध्येही विराट कोहलीला जागा मिळू शकलेली नाही.

विशेष म्हणजे, सचिनच्या या टीममध्ये ना कोहली ना भारताचा सर्वात यशस्वी माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी. त्यामुळे सचिनच्या या टीमबाबत क्रिकेट रसिकांमध्ये जाेरदार चर्चा सुरु आहे..

Advertisement

निवृत्त झाल्यापासून सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. क्रिकेटपटूंविषयी, त्यांच्या खेळाविषयी तो नेहमीच आपले मतही व्यक्त करतो. त्यामुळे सचिनचे ऑल टाईम फेव्हरेट क्रिकेटर्स कोण असतील, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याला नुकतेच सचिनने उत्तर दिले आहे.

अशी आहे सचिनची टीम..
सचिनच्या ‘प्लेईंग-11’ टीममधील काही नावांबाबत क्रिकेट रसिकांनाही अंदाज येऊ शकतो. सचिन आणि विरु अर्थात विरेंद्र सेहवाग यांची ओपनिंग जोडी चांगलीच गाजली. मात्र, सचिनने ओपनिंगसाठी विरु नव्हे, तर सुनील गावस्कर यांना स्थान दिलंय..

Advertisement

वन डाऊन, म्हणजे तिसऱ्या स्थानावर सचिनने वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा याला स्थान दिलंय, तर चौथ्या स्थानी आणखी एक वेस्ट इंडिजच्याच खेळाडूला स्थान दिलंय, ते म्हणजे व्हीव्हीयन रिचर्डस्.

सचिनच्या टीममध्ये टॉप ऑर्डरमध्ये दोन इंडियन आणि दोन वेस्ट इंडिजच्या खेळाडू निवडले आहेत. मिडल ऑर्डरमध्ये त्याने पाचव्या नंबरवर दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर जॅक कॅलिसची निवड केली आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली सहाव्या स्थानी आहे.

Advertisement

सचिनच्या या टीममध्ये धोनी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सचिनने धोनी याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट याला टीममध्ये घेतलंय. या सगळ्यात सध्याचा जगातला ‘बेस्ट बॅटसमन’ कोहलीला सचिनने जागा न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बॉलिंगमध्ये कोणाची निवड..?
सचिनची बॅटिंग स्वप्नात येत असल्याची भीती व्यक्त करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न हा आठव्या नंबरवर असेल. पाकिस्तानचा वसिम अक्रम हा नवव्या स्थानी आहे. चार बॉलर्समध्ये सचिनने भारताच्या फक्त हरभजनसिंग यालाच स्थान दिलंय. हरभजनसिंग 10 व्या, तर अकरावा खेळाडू आहे, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा..!

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement