SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर.!! नववर्षाचा पहिल्या दिवशी 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी हस्तांतरित होणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) पात्र लाभार्थ्यांना 10व्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम आज शनिवार दि.1 जानेवारी रोजी होणार आहे.
ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये देऊन केली जाते.

आज दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरीत केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी किसान सन्मान निधी योजेनेच्या लाभार्थ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डी.डी. किसान, डी. डी. नॅशनल(दूरदर्शन) या वाहिन्यांवर होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट pmindiawebcast.nic.in वर उपलब्ध असणार आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार कोटींहून अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.

Advertisement

पीएम नरेंद्र मोदींनी ट्विट करत दिली माहीती:”नवीन वर्ष 2022 चा पहिला दिवस देशातील अन्नदात्यांसाठी समर्पित असेल. आज दुपारी 12:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसानचा 10 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य मिळेल. याअंतर्गत 20 हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाईल. यामुळे 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबीयांना लाभ होईल,” असं ट्विट मोदींनी केलं आहे.

पीएम किसान योजनेत आपले नाव कसं चेक करायचं?

Advertisement

1. सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर PM Kisan ची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in उघडा.
2. मग होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. Farmers Corner पर्यायमध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा. (तसेच तुम्ही Beneficiaries status या पर्यायावर क्लिक केलं की हप्त्याविषयी माहिती मिळेल.)
4. मग लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा आणि Get Report वर क्लिक करा.
5. यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये तुम्ही आपले नाव पाहू शकता.

तुमचे सर्व तपशील बरोबर असतील आणि त्यानंतरही तुमचे नाव यादीत समाविष्ट नसेल, तर तुम्ही पीएम किसान हेल्पलाईनच्या 155261 किंवा 011-24300606 या क्रमांकावर कॉल करू शकता. येथे तुमची समस्या दूर होईल. तुम्हाला नाव नोंदवायचं असल्यास CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरमध्येही नोंदणी करू शकतात, फक्त येथे नोंदणी करायची असल्यास त्यासाठी काही शुल्क आकारलं जातं किंवा शेतकरी स्वत: PM-Kisan च्या वरील पोर्टलवर जाऊन New farmer regustration वर क्लिक करून नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement