SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बिस्किट उद्योगातून दरमहा हजारो रुपये कमाविण्याची संधी, मोदी सरकारही देतेय मदतीचा हात..

कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.. उद्याेग-व्यवसाय बंद पडले.. एकीकडे सगळे काही ठप्प होत असताना, एकच असा व्यवसाय होता, ज्यात दुकानदाराचा मोठा फायदा झाला.. तो  व्यवसाय म्हणजे, बेकरी प्राॅडक्ट…!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशभर लॉकडाऊन करण्यात आले नि सगळेच ठप्प झाले.. अशा वाईट काळातही ‘पारले-जी’ बिस्किटाची इतकी प्रचंड विक्री झाली, की गेल्या 82 वर्षांचा विक्रम मोडला गेला होता.. त्यामुळे कोणत्याही मोठ्या संकटात हा व्यवसाय चालू शकतो, हेही समोर आले..

Advertisement

सध्याच्या काळात बेकरी प्राॅडक्ट तयार करण्याचा उद्योग कमाईसाठी चांगला पर्याय ठरु शकतो.. विशेष म्हणजे, हा उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून मुद्रा (Mudra) योजनेतून मदत करण्यात येते. उद्याेग सुरु करताना तुम्हाला फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतात..

उद्योग सुरु करताना येणाऱ्या एकूण खर्चाच्या 80 टक्के निधी सरकारकडून मिळतो. त्यासाठी सरकारने स्वत: प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. सरकारने केलेल्या बिझनेस स्ट्रक्चरिंग हिशेबाने सर्व खर्च कापून गेल्यानंतर दरमहा 40 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा होऊ शकतो…

Advertisement

मुद्रा योजनेतून मदत
बेकरी उद्याेग सुरु करण्यासाठी सगळा खर्च 5 लाख 36 हजार रुपये येईल, पैकी तुम्हाला केवळ 1 लाख रुपये गुंतवावे लागतील.. मुद्रा योजनेत निवड झाल्यास बँकेकडून टर्म लोन 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये मिळेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:ची 500 स्केअर फुट जागा असावी. जागा नसल्यास भाड्यानेही घेऊ शकता. पंतप्रधान मुद्रा योजनेेसाठी कोणत्याही बँकेत अर्ज करता येतो. त्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल, त्यात नाव, पत्ता, बिझनेस अ‍ॅड्रेस, एज्युकेशन, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज हवे, याचा उल्लेख असावा..

Advertisement

योजनेसाठी प्रोसेसिंग फी किंवा गॅरंटी फी द्यावी लागत नाही. कर्जाची फेड 5 वर्षांत करता येते. उद्याेग सुरु केल्यावर त्यातून तुम्हाला दरमहा किमान 40 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement