SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एसबीआय बँकेकडून मिळवा मोफत विमा, एटीएम कार्डवर मिळणार 2 लाख रुपयांपर्यंतचा फायदा..

देशातील अग्रगण्य बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते जवळपास प्रत्येक कुटुंबातील एखाद्याचे तरी असते. जर तुमचेही खाते एससबीआय (SBI) तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. कारण एससबीआय आपल्या कस्टमर्सना 2 लाख रुपयांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स देत आहे.

एसबीआय खातेदारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स..?

Advertisement

होय, तुमचे जन धन खाते असले की तुम्हाला बँक सुविधा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2014 साली प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) सुरु करण्यात आली. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी फायनान्शिअल सर्व्हिसेस, बँकिंग सेव्हिंग आणि डिपॉझिट अकाउंट, क्रेडिट, इन्शुरन्स, पेन्शनमध्ये परवडणाऱ्या पद्धतीने या सुविधा देत आहे

एसबीआय बँकेकडून जनधन ग्राहकांना एसबीआय रुपे जनधन कार्डची महत्वाची सुविधा दिली जाते. एसबीआय रुपे कार्डवर बँकेच्या ग्राहकांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतच्या ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरची सुविधा देत आहे. रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदीही करू शकता. बेसिक सेव्हिंग अकाउंट जन धन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे. ज्यांनी 28 ऑगस्ट 2018 पूर्वी त्यांचे खाते उघडले आहे त्या ग्राहकांसाठी 1 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण आहे. त्यानंतरच्या खातेदारांसाठी 2 लाख रुपये अपघात विमा संरक्षण आहे. खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम नाही. ज्यांच्याकडे जन धन खाते आहे, त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते.

Advertisement

विम्याचा लाभ कसा घ्याल?

विम्याचा लाभ घेण्यासाठी अपघात झाल्यापासून 90 दिवसांच्या आत व्यवहार होणे आवश्यक आहे. तुम्ही लवकर व्यवहार करता यावा यासाठी रुपे डेबिट कार्ड (Rupay debit card) घ्या. हे पाहता शिल्लक तपासणे देखील व्यवहाराच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. हे खाते खास गरीब कुटुंबांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे, खातेदाराने पैसे काढले नाहीत किंवा जमा केले नाहीत, शिल्लक तपासली, तर तो व्यवहार म्हणून वर्गीकृत केला जाईल. या आधारावर नॉमिनीला अपघाती मृत्यू संरक्षणाचा लाभही दिला जाईल. या योजनेअंतर्गत पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसी भारताबाहेरील घटना देखील समाविष्ट करते.

Advertisement

प्राप्त माहीतीनुसार, ग्राहकांना एसबीआय जन धन खात्यामध्ये विमा संरक्षण मिळण्यासाठी, त्याला प्रथम क्लेम फॉर्म भरावा लागेल, ज्याच्यासाठी विमा क्लेम करायचा आहे त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत. इतर महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये अपघात अहवाल, मृत्यू अहवाल, एफएसएल अहवाल आणि मृत व्यक्तीच्या आधार कार्डची प्रत आणि घटनेची एफआयआर कॉपी द्यावी लागेल. विम्याचा दावा करण्यासाठी, अपघातानंतर 90 दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. भारताबाहेर घटना घडल्यासही आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर इन्शुरन्सच्या रकमेनुसार क्लेम भारतीय रुपयांमध्ये दिला जातो. आता जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल, तर तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन फक्त एक फॉर्म भरावा लागणार आहे.

(सदर लेख हा सध्याच्या उपलब्ध माहीतीनुसार लिहिण्यात आला आहे, जर सरकारच्या नियमांत काही बदल झाला तर आपण शासनाच्या संकेतस्थळांवरून तशी अद्ययावत माहीती घ्यावी.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement