SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी मुलांसाठी लसीकरण नोंदणी आजपासून सुरू, घरबसल्या नोंदणी करण्यासाठी जाणून घ्या..

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान मोदी यांनी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज शनिवार म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून कोविन पोर्टल (Cowin Portal) किंवा कोविन ॲपवर 15-18 वर्षे वय असणाऱ्या किशोरवयीन मुलांसाठी नोंदणीसाठी विंडो सकाळी 10 वाजता उघडली आहे. त्यांचे लसीकरण सोमवारपासून सुरू होणार आहे.

महत्वाचं म्हणजे 15-18 वर्षे वय असणाऱ्या किशोरवयीन मुलांजवळ जर आधार कार्ड नसेल तरीही ते फक्त त्यांचे 10वीचे मार्कशीट (10th marksheet) आणि आयडी कार्ड वापरून नोंदणी करून, लसीकरणासाठी स्लॉट बुक करू शकतात.

Advertisement

▪️ देशातील 15-18 वर्षे वय असणाऱ्या मुलांनी प्रथम आरोग्य सेतू ॲप किंवा Cowin.gov.in पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी.

▪️ जर तुमचे CoWIN रजिस्टर हा पर्याय निवडावा. त्यानंतर आता तुमच्या समोर एक रजिस्ट्रेशन पेज आले असेल.

Advertisement

▪️ तिथे तुमचा मोबाइल क्रमांक टाका. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा. खाली Add Member वर क्लिक करा.

▪️ तुम्ही निवडलेल्या पर्यायानंतर तुमच्या 15 ते 18 वर्ष वयातील मुलाचे/मुलीचे नाव टाका, लिंग आणि जन्म तारीख निवडा.

Advertisement

▪️ मग आधार कार्ड (Aadhaar Card), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) पॅन कार्ड (PAN Card) पासपोर्ट (Passport) पेन्शन पासबुक (Pension Passbook) व्होटर आयडी (Voter ID) रेशन कार्ड (Ration Card with Photo) किंवा तुमचं Student Photo Id Card म्हणजेच विद्यार्थ्यांचं ओळखपत्र किंवा इतर पर्यायांपैकी एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा.

▪️ मग तुम्ही तुमच्या निवडलेल्या सदस्याचं नाव जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. आता तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी येईल.

Advertisement

▪️ रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे.

▪️ ज्या मुलांना ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा नाही त्यांनी त्यांच्या ओळखपत्रासह लसीकरण केंद्रात जावे आणि तेथे ऑन-साइट लसीचा स्लॉट बुक करावा लागणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement