SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

मेष (Aries) : जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्या.

वृषभ (Taurus) : व्यवसायातील योजना लाभदायक ठरतील. मानसिक व्यग्रतेत आजचा दिवस जाईल. मित्रांच्या मदतीने एखादे जुने काम पूर्ण होईल.

मिथुन (Gemini): उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. काल्पनिक जगाची सफर आपण कराल.

कर्क (Cancer) : आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. बोलण्यातून सर्वांना आपलेसे कराल.

सिंह (Leo) : जवळचे मित्र बर्‍याच दिवसांनी भेटतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. महत्त्वाच्या नोंदी करून ठेवाव्यात.

कन्या (Virgo): स्वत:चे खरे करण्याकडे कल राहील. काम होण्यास वेळ लागेल पण प्रयत्न चालू ठेवा. कामे नक्की पूर्ण होतील. स्त्रीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

तूळ (Libra) : आर्थिक नियोजनात सुरुवातीला काही अडचणी येतील. निराश होणे टाळावे. एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृश्चिक (Scorpio) : नवीन ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. भावनेला आवर घालावी लागेल. आजचा दिवस लाभदायक ठरेल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो.

धनु (Sagittarius) : मित्र आणि स्नेही यांच्याबरोबर आजचा दिवस तुम्ही उल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. प्रवास व सहली यांची शक्यता आहे.

मकर (Capricorn) : स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घ्याल. मनात काहीशी चलबिचलता राहील. कामात स्त्रीवर्गाचा चांगला हातभार लागेल.

कुंभ (Aquarius) : वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आज मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अपेक्षित लाभाने आपण खुश राहाल.

मीन (Pisces) : बुद्धीवर्धक कामे हाताळाल. त्यामुळे बौद्धिक ताण जाणवू शकतो. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा वेळोवेळी सल्ला घ्यावा.

Advertisement