SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ओमायक्राॅनच्या या विचित्र लक्षणाकडे अनेकांचे दुर्लक्ष..! घरातील लहान मुलांना जपा..

कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षांपासून सारे जगच वेठीस धरले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु केल्यानंतरही हा आजार काही केल्या हटण्याचे नाव घेत नाही.. उलट पूर्वीपेक्षा अधिक घातक विषाणूच्या स्वरुपात समोर येतच आहे.

काही दिवसांपूर्वीच कोरोनाच डेल्टा व्हेरियंट आला होता. त्यावर उपाय सापडत नाही, तोच दक्षिण आफ्रिकेतून ‘ओमायक्राॅन’ व्हेरियंटची खबर आली. पाहता पाहता कोरोनाचा हा व्हेरियंट अवघ्या जगभर पसरला.. ‘ओमायक्राॅन’ व्हेरियंट संसर्गाचा वेग धडकी भरविणारा आहे..

Advertisement

कोरोनाच्या ‘डेल्टा’ व्हेरियंटच्या तुलनेत ‘ओमायक्रॉन’ विषाणू सौम्य असला, तरी मोठ्या वेगाने त्याचा फैलाव होत आहे. विशेष म्हणजे, कुणीही अगदी सहजपणे त्याला बळी पडू शकतो. शिवाय त्याची लक्षणेही डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत.

ओमायक्राॅनचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लादले जात आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी या व्हेरियंटच्या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्याचा संसर्ग वेळीच वाढण्यापासून रोखता येईल.

Advertisement

या लक्षणाकडे अनेकांचे दुर्लक्ष
आतापर्यंत लोकांना ओमायक्राॅनची अनेक लक्षणे माहिती झाली असली, तरी एक लक्षण असे आहे, की त्याकडे अनेकांचे लक्ष गेलेले नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लोकांना त्यांच्या त्वचेवरही लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

ओमायक्राॅन व्हेरिअंटमुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. ‘झेडओई कोविड सिम्टन स्टटी’च्या (ZOE Kovid Symptom Study App) अभ्यासानुसार, ओमायक्राॅनची बाधा झालेल्या रुग्णांनी त्वचेवर रॅशेस आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ओमायक्राॅनचे हे एक मुख्य लक्षण असून, त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Advertisement

दोन प्रकारची रॅशेस
ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास त्वचेवर दोन प्रकारच्या रॅशेस दिसतात. स्किन रॅशेसचा (Rashes) पहिला प्रकार अचानक दिसतो. लहान-लहान पुरळांसारखा तो असू शकताे. त्याला तीव्र खाज सुटते. साधारण तळहातांपासून खाज सुरू होते.

दुसऱ्या प्रकारच्या रॅशेसमध्ये, रॅशेस घामोळ्यांसारखे दिसतात व संपूर्ण शरीरावर पसरतात. साधारण कोपरा, गुडघा, हाता-पायांवर हे रॅशेस अधिक प्रमाणात दिसून येतात.

Advertisement

ओमायक्रॉनबाधित मुलांमध्ये अशा रॅशेसची समस्या दिसलीय. मात्र, प्रौढांमध्ये ही लक्षणे कमी प्रमाणात दिसल्याचे लंडनमधील एका डॉक्टरने म्हटले आहे. ओमायक्रॉनबाधित सुमारे 15 टक्के तरुणांमध्येही रॅशेस दिसल्याचे त्यांचे म्हणणे आहे..

शिवाय थकवा, डोकेदुखी आणि भूक न लागणे, यांसारख्या समस्याही आढळून आल्या. त्वचेवरील पुरळ उठण्यासोबतच ही अन्य लक्षणे ओळखणेही गरजेचे असून, त्याकडे लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement