SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पोस्टासाेबत फक्त 5 हजारांत काम सुरु करा, महिन्याला हजारो रुपये कमावण्याची संधी..!

बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.. कोरोना काळात नोकरी गेली असेल, उद्याेग-व्यवसाय बंद पडला असेल, तरी घाबरण्याचे कारण नाही.. भारतीय टपाल विभागाच्या, अर्थात पोस्टाच्या माध्यमातून तुम्हाला नवा व्यवसाय सुरु करण्याची संधी चालून आलीय..

अगदी कमी गुंतवणुकीत पोस्टाने तुम्हाला नवा व्यवसाय सुरु करण्याची संधी उपलब्ध करुन दिलीय.. फक्त त्यासाठी तुमच्या खिशात 5000 रुपये नि मनात मोठी उर्मी असायला हवी..!

Advertisement

सध्या देशभरात 1.55 लाख पोस्ट ऑफिस कार्यरत आहेत. मात्र, तरीही अशी अनेक ठिकाणे आहेत, जेथे पोस्टाची सेवा पोचलेली नाही. अशा ठिकाणी लोकांची मोठी गैरसाेय होते. ही बाब लक्षात घेऊन पोस्टाने (Indian Post Office) अशा ठिकाणी फ्रँचायझी उघडण्याची, त्या माध्यमातून दरमहा हजारो रुपये कमाविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

नेमकी स्किम काय..?
पोस्टाची फ्रँचायझी (franchise) घेण्यासाठी फक्त 5000 रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून भरावे लागतील. या ‘फ्रँचायझी’च्या माध्यमातून तुम्हाला स्टँम्प, स्टेशनरी, स्पीड पोस्ट आर्टिकल, मनी ऑर्डर यांसारख्या सुविधा ग्राहकांना देता येतील. त्या माध्यमातून चांगले कमिशन मिळवता येणार आहे.

Advertisement

फ्रँचायझीसाठी अटी..
– कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा अगदी कॉर्नर शॉप, पानवाला, किराणा, स्टेशनरी दुकानदार, छोटे दुकानदारही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेऊ शकतात.
– नव्याने सुरू झालेल्या शहरी टाउनशिप, विशेष आर्थिक क्षेत्रे, नव्याने सुरू झालेली औद्योगिक केंद्रे, महाविद्यालये, पॉलिटेक्निक, विद्यापीठे, व्यावसायिक महाविद्यालयेही फ्रेंचायझी घेऊ शकतात.

– फ्रँचायझी घेण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. त्यात निवड झाल्यानंतर पोस्टासोबत सामंजस्य करार केला जाईल.
– फ्रँचायझी घेण्यासाठी किमान पात्रता 8 वी पास, तसेच वयाेमर्यादा किमान 18 वर्षे आहे.
– पोस्टातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला फ्रेंचायझी घेता येणार नाही.

Advertisement

निवड कशी होते..?
अर्ज सादर केल्यावर 14 दिवसांत एएसपी (ASP/SDl)च्या अहवालावर आधारित, संबंधित विभागीय प्रमुखांद्वारे फ्रेंचायझीची निवड होते. पंचायत संचार सेवा केंद्रे असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये फ्रॅंचायझी उघडता येत नाही.

पोस्टल सेवांच्या बदल्यात फ्रँचायझी घेणाऱ्यांना कमिशन दिले जाते.. वेगवेगळ्या सेवांसाठी कमीशनचा दरही वेगळा आहे. मात्र, त्या माध्यमातून मोठी कमाई करता येऊ शकते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement