SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता आयफोनमध्ये सिम कार्ड घालण्यासाठी जागा नसणार, मग हे ‘ई-सिम’ फिचर काय आहे? वाचा..

आयफोन 15 मालिका 2023 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. iPhone XR, iPhone XS आणि iPhone XS Max मध्ये फिजिकल सिमसह ई-सिमचा पर्याय देण्यात आला होता. परंतु आता परंतु आता ही कंपनी फिजिकल सिमची पद्धत पूर्णपणे काढून टाकण्याच्या तयारीत आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीचा नवीन पर्याय…

Advertisement

प्राप्त माहीतीनुसार, आयफोन बनविणारी ॲपल कंपनी असा आयफोन (iPhone) घेऊन येत आहे, ज्यात सिम कार्ड टाकण्यासाठी स्लॉट नसणार आहे. सिम कार्ड न टाकता या आयफोनवर कॉल आपण करू शकतो. अधिक माहीती अशी की, ॲपल कंपनीचा हा आगामी आयफोन ई-सिमवर (e-SIM) चालणार असल्याचं कळतंय. अनेक दिवसांपासून याची टेस्टिंग सुरू आहे. iPhone 15 सीरीजमध्ये हे फीचर अपग्रेड होण्याची शक्यता आहे.

आयफोन 15 सीरीज 2023 मध्ये लॉंच होणार आहे. iPhone 15 हा सिम कार्ड स्लॉटशिवाय लॉंच होणारा पहिलाच फोन असू शकतो. मात्र, या हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला आणखी काही दिवस थांबावं लागणार आहे. दरम्यान, Apple Inc ने आपला iPhone XS Max, iPhone XR, iPhone XS आणि e-SIM च्या फिचरसह लॉंच केला आहे. यानंतर आता आयफोनमधून फिजिकल सिम कार्ड स्लॉट काढून टाकण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे.

Advertisement

ई-सिम काय असतं, जाणून घ्या…

व्होडाफोन-आयडिया (Vi) , रिलायन्स जिओ (Reliance jio) आणि एअरटेल (Airtel) भारतात ई-सिमचे फीचर देत आहेत. दूरसंचार कंपन्यांद्वारे ई-सिम ओव्हर-द-एअर एक्टिव्हेट (Over the air activate) केले जाते. ई-सिम म्हणजे मोबाईल फोनमध्ये इंस्टॉल केलेले एक व्हर्च्युअल सिम कार्ड आहे, जे ऑनलाईन एक्टिव्हेट केले जाते, यासाठी सिम कार्ड मोबाईलमध्ये घालण्याची गरज नाहीये, हे अगदी फिजीकल सिम कार्डसारखेच काम करते. जर तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केला तर तुम्हाला हे माहीती हवं.

Advertisement

ई-सिमची भारी गोष्ट ही आहे की, सिम कार्ड (Sim Card) बदलण्याची वा फोनमध्ये घालण्याची गरज नसते. म्हणून तुमचा मोबाईल फोन उघडण्याची गरजच संपते. तुम्ही ऑपरेटर (पोर्ट करून कंपनी बदलत असाल, तर..) बदलता तेव्हा तुम्हाला सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. फोनमध्ये पाणी गेल्याने ते व्हर्च्युअल असल्याने (थोडक्यात-डोळ्यांना न दिसणारे) ई-सिमवर कसलाही परिणाम होत नाही. बरेच वापरकर्ते त्यांचे सिम कार्ड काही काळानंतर व्यवस्थित काम करत नसल्याबद्दल तक्रार करतात, परंतु ई-सिमच्या बाबतीत असे होत नाही. या सगळ्या गोष्टींची चिंता लगेच दूर होते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement