SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खबरदार! राज्यात आज मध्यरात्रीपासून ‘हे’ निर्बंध लागू होणार, गर्दी कराल, तर…

राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागलाय. शासनाने मुंबईत नववर्षाच्या निमित्ताने आणि सुरक्षेच्या दृष्टीने कडक निर्बंध लावले, त्यानंतर राज्यातही ओमायक्रॉनच्या (Omicron) प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यात जमावबंदीच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे.

राज्य शासनाने काल कोरोना टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात आज (31 डिसें.) मध्यरात्रीपासून लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 लोकांची मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासोतबच राज्य सरकारने नवीन नियमावली (corona guidelines for maharashtra) जाहीर करत इतरही निर्बंध जारी केले आहेत.

Advertisement

राज्यात आज मध्यरात्रीपासून नियमावली लागू..

▪️ बंदिस्त हॉल किंवा मोकळ्या जागेतील लग्न किंवा इतर संमारंभासाठी उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

Advertisement

▪️ सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी कार्यक्रमांसाठी उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपुरतीच मर्यादित.

▪️ नवीन नियमानुसार, अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल.

Advertisement

▪️ राज्याच्या कोणत्याही भागातील पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने किंवा इतर ठिकाणी गर्दी टाळण्याचे आदेश, आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाला चौपाटय़ा, समुद्रकिनारे बंद करण्याचे दिले आदेश किंवा कलम 144 लागू करण्याची मुभा असणार आहे.

▪️ कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार परिस्थिती पाहून जर स्थानिक प्रशासनाचे तुमच्या जिल्ह्यात काही आधीचे नियम अस्तित्वात असतील तर तेही लागू राहतील.

Advertisement

कोरोनाची लाट रोखण्यासाठी राज्यात लगेचच टाळेबंदी होणार नाही, मात्र परिस्थिती अनुरूप निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास दिले आहेत. तसेच, मात्र टाळेबंदी करायची असल्यास शहर किंवा जिल्हयातील उपलब्ध खाटा आणि ऑक्सिजनची गरज याचा विचार करून टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाचा उद्रेक असाच वाढत राहिल्यास काल झालेल्या बैठकीत चित्रपटगृहे, मॉल, नाटय़गृह यांच्यावरही निर्बंध लागू करावी लागतील, अशी बैठकीत फक्त चर्चा झाली. शाळा बंद करण्याबाबतही बैठकीत विचार झाला, पण लगेचच शाळा बंद करता येणार नाहीत. शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केली, अशी सर्व मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement