SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खबरदार.. ‘एमपीएससी’विरोधात काही बोलाल तर…! राज्य लोकसेवा आयोगाचा परीक्षार्थींना गंभीर इशारा…

‘एमपीएससी’.. अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2 जानेवारी 2022 रोजी होणारी पूर्वपरीक्षा अचानक पुढे ढकलली. यापूर्वीही कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलली होती. विशेष म्हणजे, आता ही परीक्षा कधी होणार, याबाबत कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

सातत्याने ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने परीक्षार्थींकडून विविध माध्यमातून संताप व्यक्त केला जात होता. थेट आयोगाच्या कारभारावरच बोट ठेवण्यात आले.. मात्र, आयोगाला ही बोचरी टीका सहन झाली नाही.. त्यातून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करणारे पत्रकच आयोगाने काढले आहे..

Advertisement

कितीही अन्याय-अत्याचार झाले, तरी बोलायचे नाही.. त्यामुळे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे.. ‘एमपीएससी’ने काढलेल्या पत्रकात नेमक म्हटलंय, त्यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

आयोगाने काय म्हटलंय..?
‘एमपीएससी’च्या (MPSC) कारभाराबाबत असभ्य, असंस्कृत, असंसदीय प्रतिक्रिया देणाऱ्या उमेदवारांविरोधात आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयोगाच्या कार्यशैलीबाबत अयोग्य भाषेचा वापर केल्यास उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येणार असल्याचा इशारा आयोगाने दिला आहे.

‘एमपीएससी’मार्फत राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेबाबत अनेकदा प्रसार माध्यमे, समाज माध्यमे नि सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांकडून असभ्य भाषेचा वापर केला जात असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा पोचते.

Advertisement

‘एमपीएससी’ विरोधात बोलणाऱ्या उमेदवारांविरूद्ध आता कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. स्वतःच्या अधिकारांचा वापर करून अशा उमेदवारांना परीक्षेलाही बसू दिले जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराच आयोगाने दिला आहे..

आयोगाच्या पत्रकावर संताप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानंतर आयोगावर जोरदार टीका करण्यात येत आहे. आधी वेळेवर परीक्षा घेऊन त्याचे निकाल नीट लावा. ते सोडून परीक्षार्थींना धमकावणारे पत्रक लिहिण्यात वेळ नि शक्ती खर्च केली जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे..

Advertisement

कोणत्याही असभ्य, अश्लील टीकेचं समर्थन होणार नाही, पण या व्याख्येच्या आड कोणीही आयाेगा विरोधात बोलूच नये, अशी योजना दिसते. मुळात अशी टीका होणारच नाही, असा कारभार ‘एमपीएससी’ने करावा, असा सल्लाही काहींनी आयोगाला दिला आहे.

 

Advertisement