SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीत, भारत विजयाच्या दिशेने..

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या भारताने सहज खेळ करत पुन्हा आपणच क्रिकेटचे बॉस असल्याचं सिद्ध केलं. भारत आणि यजमान दक्षिण अफ्रीका (Ind vs SA 1st test match) यांच्यामध्ये सेंच्युरियन मैदानावर चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकासमोर भारतीय संघानं विजयासाठी 305 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 94 धावा केल्या आहेत.

पहिला कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह (2/22), मोहम्मद सिराज (1/25) आणि मोहम्मद शमी (1/29) या भारताच्या वेगवान बॉलर्समुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा जवळपास विजय होणे निश्चितच आहे.

Advertisement

भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी (india vs south africa) ठेवलेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर आफ्रिकेची दुसऱ्या डावात 4 बाद 94 धावा होती. या कसोटीचा दुसरा दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला होता तर इतर दिवसांमध्ये खेळ झाला तर पाचव्या दिवशी पुन्हा पावसाची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून सध्या कर्णधार डीन एल्गर 52 धावांवर नाबाद खेळत आहे आणि या विकेटसोबतच भारताला दक्षिण आफ्रिकेच्या पूर्ण संघाला बाद करावं लागणार आहे, म्हणजे अजून 6 विकेट्स भारताला आज विजयासाठी आवश्यक आहे. आफ्रिकेच्या कर्णधार डीन एल्गरच्या 52 धावानंतर तो पुढे खेळत राहून आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणून ही कसोटी अनिर्णित राखण्याच्या आशा निर्माण करू शकतो.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात फलंदाजी:

पहिल्या डावात पाच बळी घेण्याची किमया साधणाऱ्या शमीने एडन मार्करमचा 1 धावेवर त्रिफळाचीत केलं. कीगान पीटरसनचा 17 धावांवर मोहम्मद सिराजने बळी टिपला. एल्गरने रॅसी व्हॅन डर दुसेनच्या साथीने 40 धावांची भागीदारी केली. अखेरच्या काही षटकांत बुमराहने रॅसी 1 धावेवर आणि मग नाइट वॉचमन केशव महाराज 8 धावांवर त्रिफळा उडवला. आता आफ्रिकेला आणखी 211 धावांची आवश्यकता आहे.

Advertisement

भारताची दुसऱ्या डावात फलंदाजी:

तत्पूर्वी, भारताचा दुसरा डाव आफ्रिकेने 174 धावांतच गुंडाळला. चेतेश्वर पुजारा (16), कोहली (18) आणि अजिंक्य रहाणे (20) या अनुभवी फलंदाजांनी काहीसं योगदान दिलं. तर अन्य फलंदाजांनाही खेळपट्टीवर टीकाव धरता आला नाही. ऋषभ पंत (34) आणि के. एल. राहुल (23) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले, तर लुंगी एन्गिडीने दोन बळी घेत साथ दिली.

Advertisement

भारत-दक्षिण आफ्रिका स्कोअरबोर्ड…

▪️ भारत (पहिला डाव) : 327
▪️ दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : 197
▪️ भारत (दुसरा डाव) : 50.3 षटकांत सर्वबाद 174 (ऋषभ पंत 34, के. एल. राहुल 23; कगिसो रबाडा 4/42, मार्को जॅन्सन 4/55)
▪️ दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : 40.5 षटकांत 4 बाद 94 (डीन एल्गर खेळत आहे 52; जसप्रीत बुमरा 2/22), आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे आव्हान.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement