SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

💁🏻‍♂️ महाराष्ट्रात कोरोनाचे एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

🔒 उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत..

Advertisement

🤕 कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा वेग वाढत असून मंगळवारी राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

🗣️ माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असताना ते म्हणाले, “कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दररोज ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढत असून यावर आरोग्य यंत्रणा नजर ठेवून आहे. तिसरी लाट म्हणून सरकार याकडे पाहत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील”, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Advertisement

👥 राज्यात सार्वजनिक ठिकाणी पुन्हा होणारी तुफान गर्दी आणि कोरोनाविषयक नियम न पाळणे यामुळे ही आकडेवारी एवढी वाढली आहे. राज्यात काल दिवसभरात 22 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काही जिल्ह्यांत जमावबंदीचे आदेशही लागू केले आहेत.

📍 कोविड टास्क फोर्स या पार्श्वभूमीवर सक्रिय झाला आहे. टास्क फोर्सकडून जंबो हॉस्पिटलमध्ये मॉक ड्रिल सुरू आहेत. कोविड टास्क फोर्स सिरीज पंप, मल्टी-पॅरा मॉनिटर्स, व्हेंटिलेटर यांच्यासह पाइपलाईन चाचणी तसंच पॅथॉलॉजीच्या चाचणीसाठी ड्रिल करत आहे. कोविड टास्क फोर्सचे पथक सध्या ड्रिल करत आहेत जी स्पष्टपणे संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी असल्याचं बोललं जातंय. जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडली तर तशी उपाययोजना राबवणं सोईस्कर होईल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement