SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 29 डिसेंबर 2021

मेष (Aries) : जबाबदारीने कामे कराल, आर्थिक प्रश्न सुटतील, पदोन्नतीचे योग, आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस. नोकरी-व्यवसायात परिश्रमाचे चीज होईल.

वृषभ (Taurus) : पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. कुटुंबियांसोबत ‘वीक एन्ड’ साजरा करण्याचे नियोजन आखाल. वरिष्ठांच्या काही गोष्टींची खबरदारी घ्या.

मिथुन (Gemini): एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्याल.

कर्क (Cancer): आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते. सहकारी वर्गाला आपल्या मदतीची गरज भासेल.

सिंह (Leo) : आजोबांची जितके शक्य असेल याची काळजी घ्या. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. मुलांच्या मागण्या पूर्ण कराल.

कन्या (Virgo): पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.

तूळ (Libra): अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

वृश्चिक (Scorpio) : आईचे आरोग्य बिघडेल. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. मूत्रविकार बळावल्यास उपचार घ्या.

धनु (Sagittarius) : व्यापारी वर्गाला विशेषत: चांगली सफलता मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो. जोडीदाराच्या कामकाजात अडचणी येतील.

मकर (Capricorn) : वाहने जपून चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कौटुंबिक जीवनात विसंवाद संभवतो. वादविवाद टाळावेत.

कुंभ (Aquarius) : व्यवसायातील निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कौटुंबिक जीवनात कटकटी संभवतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सहकारी वर्गावर विसंबून राहू नका.

मीन (Pisces) : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. पर्यायी योजना तयार ठेवावी लागेल. मुलांच्या बाबतीत अनपेक्षित खर्च वाढतील.

Advertisement