SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नववर्षाचे स्वागत दणक्यात करण्याचा प्लॅन केलाय..? मग आधी ठाकरे सरकारची नियमावली वाचा..!

कोरोनाचे सावट कायम असतानाच, आता ओमायक्राेनचे नवे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘नाईट कर्फ्यू’ जाहीर केला असून, हे निर्बंध आणखी कडक केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विविध सण-उत्सव, समारंभावर निर्बंध आले आहेत..

अशातच दुसरीकडे नववर्षांच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा आनंद नागरिकांना घेता येत नाही.

Advertisement

यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव नि त्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या उत्साहाला थोडीशी वेसण घालावी लागणार आहे. त्यामुळे यंदा नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे, याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे..

दरम्यान, ठाकरे सरकारने नवीन वर्षाच्या स्वागत करताना, आनंद व्यक्त करताना, काय काळजी घ्यायला हवी, याबाबत गृह विभागाने एक नियमावली जाहीर केली आहे. तसेच नूतन वर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, असे आवाहन केले आहे..

Advertisement

अशी आहे नियमावली..!
– नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच साधेपणाने आनंद साजरा करावा.
– राज्यात 25 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ लागू केला असून, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी आहे. त्याचे पालन करावे.

– नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रम बंदिस्त सभागृहात आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत किंवा खुल्या जागेत उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के मर्यादेत करावेत.
– कार्यक्रमासाठी गर्दी करु नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. कार्यक्रमांचे ठिकाणाचे निर्जंतूकीकरण करावे..

Advertisement

– 60 वर्षांवरील नागरिक, तसेच 10 वर्षांखालील मुलांनी आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर जाणे टाळावे.
– 31 डिसेंबरला समुद्र किनारी, बागेत एकाच वेळी गर्दी न करता, सोशल डिस्टन्स पाळावा.. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

– कोणत्याही प्रकारचे धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत, तसेच मिरवणुका काढू नये.
– नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिक धार्मिक स्थळी जातात. एकाच वेळी गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे..

Advertisement

– फटाक्यांची आतिषबाजी करू नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
– शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

– 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या काळात नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांचे अनुपालन करावे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृह विभागाने केले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement