SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बचपन का प्यार’ गाण्यातील ‘या’ चिमुकल्याचा अपघात, प्रकृतीबाबत रॅपर बादशाहने दिली माहीती..

भारतातील रॅपर बादशहाने एका मुलासोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणे तुम्हाला आठवत असेल. त्यात सहदेव दिरदो हा ‘बचपन का प्यार’ या गाण्यामुळे फेमस झालेला बालकलाकार आहे. तर या गाण्यामुळे देशात प्रसिद्ध झालेल्या चिमुरड्या सहदेव दिरदोचा (Sahdev Dirdo Accident) अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

दुचाकीवर प्रवास करताना 10 वर्षांच्या सहदेवचा छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात अपघात झाला. यामध्ये सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत (Sahdev Dirdo Injured) झाली असून अपघात झाल्यानंतर काही लोकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले होते.

Advertisement

सहदेव दिरदोबद्दल थोडक्यात…

काही दिवसांपूर्वीच आपल्यातील बहुतेकांच्या ओठांवर “जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार मेरा, भूल नहीं जाना रे” हे गाणं यायचं. पण तुम्हाला माहीती असेलच की, हे गाणं सहदेव दिरदोने गायलं आहे आणि काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

Advertisement

दहा वर्षांच्या सहदेव दिरदोने अनोख्या स्टाईलमध्ये गायलेलं, जुलै महिन्यात अपलोड झालेलं हे गाणं काही दिवसांतच देशात व्हायरल झालं. मग या गाण्याची कमाल इथपर्यंत पोहीचली की स्वतः रॅपर बादशाहनेही तेच गाणं सहदेव सोबत सादर केलं आणि मग काय या गाण्याचे रॅप व्हर्जनही आलं. सहदेवच्या या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

रॅपर बादशाह सहदेवच्या भेटीला..!

Advertisement

प्रसिद्ध रॅपर बादशाहने आपण सहदेवच्या भेटीला जात असल्याचं मंगळवारी (ता.28 डिसें.) रात्री ट्विटरवर सांगितलं. तो म्हणाला, “सहदेवच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या सातत्याने मी संपर्कात आहे. तो बेशुद्धावस्थेत आहे. मी त्याच्या पाठीशी आहेच, तुमच्या प्रार्थनांचीही मला गरज आहे” असं बादशाहने ट्वीट करत सांगितलं आहे.

अपघात घडला आणि मग…

Advertisement

दरम्यान, सहदेव त्याच्या बाईकवरुन गावी परत येत असताना हा अपघात झाला. त्याच्यासोबत असणारी व्यक्ती त्याचे वडील असल्याचं कळतंय. बाईकवरुन पडल्यामुळे सहदेव जखमी झाला. काल मंगळवारी झालेल्या या अपघातात सहदेवने हेल्मेट न घातल्याने अपघातानंतर डोक्याला गंभीर इजा झाली आहे. सुकमा जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला जगदलपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिफ्ट करण्यात आले. डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. आता डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर देखरेख करत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement