SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

करदात्यांना मोठा दिलासा..! आयकर विभागाने घेतला महत्वपूर्ण निर्णय, असा होणार फायदा..

करदात्यांसाठी मोठी बातमी आहे.. आर्थिक वर्ष 2019-20 मधील आयकर विवरण पत्राचे ‘ई-व्हेरिफिकेशन’ राहिले असले, तरी काळजी करु नका.. आयकर विभागाने 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आयकर विवरणपत्राचे ‘ई-व्हेरिफिकेशन’ करण्यासाठी मुदतवाढ दिलीय. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एकूण 5.95 कोटी ‘आयटीआर’ दाखल करण्यात आले होते. मात्र, यंदा (2021-22) देशात 28 डिसेंबरपर्यंत 4.86 कोटी ‘आयटीआर’ भरण्यात आले आहेत. आयकर विवरण दाखल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

Advertisement

मागील वर्षाइतके ‘आयटीआर’ दाखल करण्यासाठी अद्याप सुमारे 9 लाख अर्ज भरले जाणे अपेक्षित आहे. मात्र, आता त्यासाठी फक्त तीन दिवस राहिले असून, या काळात किती आयटीआर भरले जातात, याकडे लक्ष लागले आहेत..

करदात्यांना बंगळुरू येथील ‘सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर’ (सीपीसी) कार्यालयात ‘आयटीआर’ची प्रत पाठवून ‘व्हेरिफिकेशन’ करता येते. ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत आयकर विवरणपत्र दाखल होत नाही.

Advertisement

डिजीटल स्वाक्षरीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आधार ओटीपी, नेटबँकिंग, डिमॅट खात्याद्वारे पाठवण्यात आलेला कोड ‘व्हेरिफाय’ करावा लागतो. हे ‘ई-व्हेरिफिकेशन’ आयकर दाखल केल्यानंतर 120 दिवसांत करावे लागते.

मुदतवाढीची मागणी
केंद्र सरकारने याआधी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत 31 जुलैहून 30 सप्टेंबर व त्यानंतर 31 डिसेंबर केली होती. मात्र, आयकर खात्याच्या वेबपोर्टलबाबत असंतोष वाढत असून, ‘आयटीआर’ दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी सोशल मीडियावर तसा ‘हॅशटॅग’ ट्रेंड होत आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement