SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: पोलीस दलात 50 हजार पदांची भरती होणार, गृहमंत्र्यांचा पोलिसांच्या बदलीबाबत ‘हा’ मोठा निर्णय..

राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर अनेकदा महत्वाची पाऊले उचलली जातात. काल विधानसभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. त्यामध्ये राज्यात पोलीस दलाची ताकद वाढविण्यासाठी 50 हजार पदांची भरती (Police force recruitment for 50,000 posts) करण्यात येईल, अशी मोठी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल (ता.28 डिसें.) मंगळवारी विधानसभेत केली.

विधानसभेत राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) मान्य करत म्हणाले “आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी राज्यात 60 हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती, त्यातील 10 हजार पोलिसांची भरती करण्यात आली. आता राज्यात उर्वरित 50 हजार पोलिसांची भरती करायची आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक घेऊन त्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

महाराष्ट्रात अनेक गुन्हे घडत आहेत. सुव्यवस्था बऱ्याच प्रमाणात नाहीशी झाली आहे. राज्यात भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचारांतही वाढ झालेली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याला गृहमंत्री वळसे पाटील यांनीही कबुली देत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलंय.

सध्या महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी शक्ती कायदा केला गेला आहे. पण त्यातील गुन्हेगाराला द्यावयाच्या फाशीच्या शिक्षेसाठी वेगवेगळी मते आहेत. त्यामध्ये सरसकट फाशीच्या शिक्षेची तरतूद नसून, अत्यंत घृणास्पद कृत्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं. तसेच, पोलीस भरती करण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करून राज्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही गृहमंत्री म्हणाले.

Advertisement

पोलिसांच्या बदलीसाठी 1 रुपयाही द्यावा लागणार नाही?

विधानसभेत बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी “मी हमी देतो, यापुढे आता बदलीसाठी कोणाला 1 रुपया द्यावा लागणार नाही. तसे काही झालंच आणि तक्रार माझ्याकडे आली तर छोटा अधिकारी असो, मोठा अधिकारी असो किंवा कुणीही असला तर कारवाई होणे अटळ आहे”, असं सांगितलं आहे. तसेच, राज्यात 75 पोलीस स्टेशन उभारण्याचं काम गृह विभागाने हाती घेतले आहे, या अमृत महोत्सवी वर्षात हे काम करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस स्टेशन व दुसऱ्या टप्प्यात पोलीस निवास हा मुद्दा आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement