SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 10 रुपयांत 12 वॅटचा एलईडी बल्ब मिळणार, मोदी सरकारची विशेष योजना..!

वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे.. पूर्वी पिवळा बल्ब 100 ते 200 वॅटचे असत.. मात्र, ‘एलईडी’ बल्ब आल्यापासून अवघ्या 4 वॅटच्या बल्बमध्ये तेवढाच प्रकाश मिळू लागला..

सरकारही ‘एलईडी’ बल्बचा वापर वाढावा, यासाठा ग्राहकांना प्रोत्साहन देत आहे.. ‘एलईडी’ बल्बमुळे वीज बचत होते, ग्राहकांना कमी वीजबिल येते.. वीज बचतीसाेबतच कोळसा किंवा गॅसचा वापरही कमी होतो.

Advertisement

बाजारात एलईडी बल्ब खरेदी करायला गेल्यास, त्यासाठी किमान 100 रुपयांच्या आसपास पैसे मोजावे लागतात. एलईडी बल्बची किंमत अधिक असल्यानेच सर्वसामान्य नागरिक त्याचा वापर करीत नसल्याचे समोर आले..

सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात ‘एलईडी’ बल्ब मिळावेत, यासाठी केंद्र सरकारने एक योजना सुरु केली आहे. ग्राम उजाला योजना, असे या याेजनेचे नाव आहे..

Advertisement

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला फक्त 10 रुपयांत 12 वॅटचा एलईडी बल्ब खरेदी करता येणार आहे. या बल्बवर तीन वर्षांची गँरंटीही मिळणार आहे. सरकारी कंपनी ‘कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड’ (CESL) मार्फत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 5 बल्ब देत आहे. ग्राम उजाला योजनेत 7 ते 12 वॅटपर्यंतचे बल्ब दिले जात आहेत.

सध्या बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ग्राम उजाला योजना (Gram Ujala Yojana) राबविण्यात येत आहे. या राज्यातील ग्रामीण कुटुंब बल्ब घेऊ शकतात. ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत चालणार आहे.

Advertisement

कॅम्प लावून ‘एलईडी’ बल्ब वितरण
‘सीईएसएल’मार्फत ठिकठिकाणी कॅम्प लावून ‘एलईडी’ बल्बच्या वितरण करण्यात येत आहे. सरकारने अशा प्रकारे बल्बची विक्री वाढविण्यासाठी अनुदान देण्याची तरतूदही केली आहे. सर्व राज्य आपापल्या परीने ही योजना राबवणार आहेत. विजेचं बिल दाखवून कमी भावात ‘एलईडी’ बल्ब विकत घेता येतील.

सरकारने आपल्यासमोर दोन उद्दिष्ट ठेवले आहेत. एक म्हणजे वीजबचती व कार्बनच्या उत्सर्जनाला आळा घालणे. योजनेतून ग्रामीण भागात दरवर्षी 71,99,68,373.28 युनिट वीज वाचवता येईल. त्यामुळे खर्चाच्या स्वरूपात वार्षिक सुमारे 250 कोटी रुपये एवढी बचत होणार आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement