कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचं संकट वाढत्या आकड्यामुळे जगावर पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे.
देशात आजपर्यंत ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या ही 400 च्याही वर गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारनेही आवश्यक पाऊले उचलत लसीकरणावर भर देऊन आरोग्यविषयक नियम पाळण्याचे सांगितले आहे.
देशात जसजशी रुग्णसंख्या वाढतेय, तसे आता काही राज्यांमध्ये संचारबंदी लागू झाली आहे. कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलंय. सध्या आता या ओमायक्रॉन विषाणूची लक्षणं कशा स्वरूपाची आहेत, ते जाणून घ्या..
ओमायक्रॉनची विषाणूची लक्षणं..!
▪️दक्षिण आफ्रिकेतून जगात कमी वेळेत जास्त पसरणारा ओमायक्रॉन जेव्हा पहिल्यांदा कोरोनाचा प्रसार झाला होता, तेव्हा याचे सर्दी-खोकला हे या विषाणूची प्राथमिक लक्षणं (2 biggest symptoms of Omicron Variant) असल्याचं सांगण्यात आलं.
▪️ दरम्यान ओमायक्रॉनबाबत तसं काही नाही. जरी एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झालीच तरी सुरुवातीला 2 ते 3 दिवस सर्दी-खोकला होत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळतेय.
भारताची चिंता वाढली..!! देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 600 पार; जाणून घ्या आकडेवारी :
View this post on InstagramAdvertisement
▪️ ओमायक्रॉनचे 2 प्रमुख आणि महत्वाची लक्षणं आहेत. सर्वात आधी डोकेदुखीचा त्रास होतो मग थकवा (Headache and Fatigue) जाणवतो. त्यामुळे ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील, तर नक्की उपचार घ्या.
▪️डोकेदुखी आणि थकवा सोडला तर ओमायक्रॉनची बरीच लक्षणं असल्याचं कळतंय, ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत धोकादायक नसल्याचं वक्तव्य कुठेही पाहण्यात आलं असेल, तरी आपण हलगर्जीपणा करुन चालणार नाही.
▪️ ओमायक्रॉनच्या काही सूक्ष्म लक्षणांमध्ये सौम्य तापाचा समावेश आहे. जो ताप थोडा फार उपचार केला तरी उतरतो. ताप आलेला समजला नाही तर तसेच गळ्यात खवखव आणि अंगदुखी जाणवत असेल, तर आपण डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
ओमायक्रॉनमध्ये कोरोनाप्रमाणे वास न येणं आणि तोंडाची चव जाण्यासारखी लक्षणं नाहीत, असं अद्याप जाणवलं नाहीये. ओमायक्रॉनपासून स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी कोरोना लसीचे 2 डोस घेणं महत्वाचं आहे, मास्क घालणं अनिवार्य आहे आणि जमेल तितक्या वेळी हाताचा बहुतांश बाहेर ठिकाणी अनेक वस्तुंना, गाडीला किंवा इतर खूप ठिकाणी स्पर्श होतोय तर मग सॅनिटायझर नक्की वापरा. मास्क काढण्याच्या वेळेस बाहेरील बाजूस हात लावू नये, अशी काळजी घेणे आपण आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE