भारतात पुढील आर्थिक वर्षात (Financial Year 2022-23) चार नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू होण्याची शक्यता आहे. देशातील व्यवसाय सुलभ करण्यासाठी हे चार लेबर कोड अत्यंत प्रभावी ठरतील, असे मत देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
नुकताच UAE नं संपूर्ण देशभरात साडे चार दिवसांचा आठवडा (4 day Week) जाहीर केल्याचं आपण ऐकलं असेलच. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भारतात कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा (4 day week in India) होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारने (Central Government) मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर राज्य सरकारे (State Government) त्याचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहीती मिळाली आहे.
कर्मचाऱ्यांना आठवड्याला 4 दिवस काम?
देशात नवीन लेबर कोड (What is New labor Code) हे फायनान्शिअल इयर 2022-23 (Financial Year 2022-23) मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातही लवकरच कर्मचाऱ्यांसाठी कामाचे चार दिवस होण्याची चिन्हं आहेत.
माहितीनुसार, 2022 पासून सुरू होणार्या पुढील आर्थिक वर्षात भारत वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा यांवर चार नवीन कामगार संहिता लागू करण्याची शक्यता आहे. प्रस्तावित कामगार संहितेनुसार घरभाडे, रजा, प्रवास आदी एकूण भत्ते पगाराच्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवावेत, तर मूळ वेतन उर्वरित 50 टक्के असावे. यामुळे एका विशिष्ट विभागाला कमी वेतन मिळेल, परंतु सेवानिवृत्ती निधीमध्ये त्यांचे योगदान वाढेल.
नवीन लेबर कोड लागू झाल्यास..
आगामी नवीन वर्षापासून भारतातील कर्मचारी कामाचा आठवडा 4 दिवसांच्या होऊ शकतो. कंपन्या दररोज 12 तासांच्या कामाच्या वेळेसह 4 दिवसांचा कामाचा आठवडा देखील लागू करू शकतात. म्हणून त्या 4 दिवसांत 12 तास (Working Hours in 4 day week) काम करावे लागण्याची शक्यता वाढू शकते.
कर्मचाऱ्यांना 4 दिवसांचा कामाचा आठवडा लागू झाला तर आठवड्याला कर्मचाऱ्यांना आठवड्यात कमीत कमी 48 तास काम करावेच लागू शकते, असे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केलंय.
लेबर कोड (Labour code) लागू झाले तर कर्मचार्यांच्या टेक-होम पगार मात्र जरासा कमी होण्याची चिन्हं आहेत. नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना सगळे भत्ते वगैरे कपात झाल्यानंतर जो हातात मिळणारा मासिक पगार आहे तो जरी कमी मिळाल्यासारखा वाटला, पण कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात दरमहा योगदानात वाढ होईल आणि त्याचे अनेक फायदेही होतील.
असा अंदाज आहे की, नियम भत्ते 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित होतील आणि पगाराचा अर्धा भाग मूळ वेतन असेल आणि भविष्य निर्वाह निधीमधील योगदान हे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा समावेश असलेल्या मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या रूपात असेल. एकूणच काय तर या सर्व गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांना सोयीसुविधा आणि सुट्या मिळणार आहेत. पण काही सुविधाही मिळणार आहे. आता भारतात हे कायदे लागून होणार तर कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE